IRCTC Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

IRCTC चा नवा टूर प्लान! Family सोबत करा अंदमानची ट्रिप, खर्च किती? जाणून घ्या सर्वकाही

कोमल दामुद्रे

Andaman Tour Package :

भारतात असे अनेक ठिकाणे आहे. जिथे निसर्ग सौंदर्य आजही डोळ्याचे पारणे फेडते. अशा ठिकाणी आपल्या पार्टनर सोबत तसेच कुटुंबासोबत जाण्याची मज्जा काही औरच असते. परंतु, बरेचदा बजेटमुळे आपल्याला फिरता येत नाही.

अंदमान बेट हे सर्वात लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. दरवर्षी या ठिकाणी लाखो प्रवासी फिरण्यासाठी येतात. अशातच आयरआरसीटीसीने (IRCTC) या ठिकाणी फिरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खास पॅकेज आणलं आहे.

अंदमान बेटाला भेट देण्यासाठी सगळ्यात चांगला काळ म्हणजे हिवाळा. अर्थात नोव्हेंबर ते फेब्रुवारी. इथलं हवामान प्रवाशासाठी आणि अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहाण्यासाठी चांगले मानले जाते. जाणून घेऊया या टूर (Tour) प्लानबद्दल

  • पॅकेजचे नाव - अमेझिंग अंदमान माजी दिल्ली

  • पॅकेज कालावधी - ५ रात्री, ६ दिवस

  • प्रवास मोड - फ्लाइट

  • कुठे फिरता येणार? -

    नील आयलंड, नॉर्थ बे आयलंड, पोर्ट ब्लेअर, रोझ आयलंड

1. टूर पॅकेज तारीख

  • १५ जानेवारी २०२४, ५ फेब्रुवारी २०२४ आणि २६ फेब्रुवारी २०२४

  • टूर पॅकेजमध्ये (Package) या सुविधा मिळतील

  • राहाण्यासाठी हॉटेलची सोय.

  • जेवणाची सुविधा असेल.

  • ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळेल.

2. प्रवासाचे शुल्क

  • जर तुम्ही सोल ट्रॅव्हल ट्रिप करत असाल तर जानेवारीमध्ये तुम्हाला ८९,५०० रुपये मोजावे लागतील तर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला ७९,९०० रुपये मोजावे लागतील.

  • जानेवारी महिन्यात तुम्ही पार्टनरसोबत ट्रिप प्लान करत असाल तर प्रति व्यक्ती ७२,६०० रुपये आहे, तर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला त्यासाठी ६१,८०० रुपये मोजावे लागतील.

  • जानेवारी महिन्यात फॅमिलीसोबत फिरायचे असेल तर प्रति व्यक्ती ७०,९९० रुपये शुल्क भरावे लागेल. तर फेब्रुवारीमध्ये ६०,१०० रुपये भरावे लागतील. जर यामध्ये तुमच्या सोबत लहान मुले असतील तर वेगळी फी भरावी लागेल.

3. बुकिंग कसे कराल?

या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल. तसेच यामध्ये IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT