IRCTC Kerala Trip Saam TV
लाईफस्टाईल

IRCTC Kerala Package: हिरवा निसर्ग, अथांग समुद्र अन् बरंच काही; IRCTC सोबत केरळची ही ट्रिप नक्कीच करा

IRCTC Kerala Trip Package Details: पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवा निसर्ग पाहायला मिळतो. ऑक्टोबर महिन्यात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे आयआरसीटीसीच्या केरळची ट्रिप करु शकतात.

Siddhi Hande

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. पावसाळ्यानंतर सर्वत्र हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. हिरवागार निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी ऑक्टोबर हा महिना एकदम परफेक्ट आहे. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही भारतातील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात केरळमधील निसर्ग अजूनच बहरतो. ऑक्टोबर महिन्यात केरळ फिरण्यासाठी आयआरसीटीसीने पॅकेज लाँच केले आहे.

आयआरसीटीसीच्या या पॅकेजचे नाव सेलेस्टियल केरळ टूर असे आहे. ही टूर ५ रात्री आणि ६ दिवसांची असणार आहे. या ट्रिपमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करायला मिळणार आहे. या ट्रिपमध्ये तुम्हाला कोची, कुमारकोम, मुन्नार, थेक्कडी या ठिकाणांना भेट द्यायला मिळणार आहे.

या ट्रिपसाठी तुम्हाला राउंट ट्रिप फ्लाइट तिकिटे मिळतील. राहण्यासाठी ३ स्टार हॉटेलची सुविधा असणार आहे. या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरचा समावेश असणार आहे. तसेच पॅकेजमध्ये प्रवास विमा मिळणार आहे.

या ट्रिपमध्ये तुम्ही जर एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ५४,३०० रुपये खर्च येईल. जर दोन जण ही ट्रिप करत असतील तर त्यांना प्रति व्यक्ती ४१,३०० रुपये भरावे लागणार आहे. तीन जणांचा ग्रुप असेल तर त्यांना ४०,००० रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरावे लागणार आहे. लहान मुलांसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. ५-११ वर्षांमधील मुलाच्या बेडसाठी तुम्हाला ३६,१०० रुपये भरावे लागतील तर बेडीशिवाय ३१,९०० रुपये द्यावे लागतील.

आयआरसीटीसीने एक्स या अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. जर तुम्हाला केरळची ट्रिप करायची असेल तर तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT