National Pension Scheme Saam Tv
लाईफस्टाईल

National Pension Scheme : बायकोच्या नावाने उघडा हे अकाऊंट, केवळ 1000 रुपयात मिळवा दर महिना 45000 पर्यंत फायदा

NPS Investment Scheme: प्रत्येकालाच आपले आणि आपल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करायचे असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

National Pension Scheme (नॅशनल पेन्शन स्कीम) Calculator:

प्रत्येकालाच आपले आणि आपल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करायचे असते. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक योजनादेखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला तुमच्या पत्नीला स्वावलंबी बनवायचे असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.

तुम्ही तुमच्या पत्नीच्या भविष्यासाठी गुतंवणूक करु शकता. जेणेतकरुन तुमच्या आणि तुमच्या पत्नीचे भविष्य सुरक्षित होईल. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)खाते पत्नीच्या नावाने उघडल्यास अनेक फायदे (Benefits) होतील. NPS खात्यातून, तुमच्या पत्नीला 60 व्या वर्षी ठरावीक रक्कम मिळेल.

एवढेच नाही तर जर महिन्याला पत्नीला नियमित पैसेही मिळणार आहेत. एवढेच नाही तर NPS खात्याच्या माध्यामातून तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे ठरवू शकता. यामुळे तुमची पत्नी वयाच्या 60 वर्षांनंततर आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. या योजनेबाबत सविस्तर माहिती पाहूयात.

प्रत्येक वर्षी किंवा महिन्याच्या आधारावर गुंतवणूक करा

तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा दरवर्षी NPSमध्ये गुतंवणूक करु शकता. तुम्ही फक्त 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. मागील बदललेल्या नियमांनुसार. तुम्ही वयाच्या 65 वर्षापर्यंत NPS खात्यात गुंतवणूक (Investment) करु शकता.

पेन्शन सुमारे 45,000 रुपये असेल

जर तुमची पत्नी 30 वर्षाची असेल अन् तेव्हापासून तुम्ही तिच्या NPS खात्यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. वर्षाला 60000 म्हणजे महिन्याला 5000 रुपये गुंतवण्यास सुरवात केली.

या गुंतवणूकीवर 10 टक्के परतावा मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्या पत्नीच्या खात्यात 1.13 कोटी रुपये जमा असतील. यातून सुमारे 45 लाख रुपये तुम्हाला मिळतील. याशिवाय तुम्हाला 45 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळेल. विशेष म्हणजे, आयुष्यभर ही पेन्शन मिळत राहील.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

वय - 30 वर्षे

एकूण गुंतवणूक कालावधी - 30 वर्षे

मासिक योगदान - 5,000 रुपये

गुंतवणुकीवर अंदाजे परतावा - 10%

एकूण पेन्शन फंड - रु 1,13,96,627

वार्षिक योजना खरेदी करण्यासाठी रक्कम - रु 45,58,651

अंदाजे वार्षिक दर 8% – 68,37,976 रुपये

मासिक पेन्शन – सुमारे 45,000 रुपये

फंड मॅनेजर खाते मॅनेज करतात

NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेतील तुमची गुंतवणूक व्यावसायिक फंड (Fund) मॅनेजरद्वारे मॅनेज केली जाते. त्यामुळे तुमची NPS मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. मात्र, त्याअंतर्गत गुंतवलेल्या पैशावर परतावा मिळण्याची शाश्वती नाही. फायनांनशियल प्लॅनरच्या मते, NPS ने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT