Back Pain Yoga Saam Tv
लाईफस्टाईल

Back Pain Yoga : सतत एकाच जागी बसल्यामुळे कंबर दुखते ? हा योग करा, तासाभरात मिळेल आराम

Best Yoga Pose For Back Pain : ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी अधिक वेळा बसून राहिल्यावर एकतर आपली पाठ दुखते किंवा कंबर.

कोमल दामुद्रे

International Yoga Day 2023 : ऑफिसमध्ये किंवा काम करताना आपण एकाच ठिकाणी अधिक वेळा बसून राहिल्यावर एकतर आपली पाठ दुखते किंवा कंबर. या दुखण्याला आपल्याला सामोरे जावे लागते. महिलांना या त्रासाला अनेकदा सामोरे जावे लागते.

अशावेळी लगेच आराम मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपचार करतो. पण या दुखण्यावर काही आराम मिळत नाही. पण आज आम्ही तुम्हाला असा एक योग (Yoga) सांगणार आहोत ज्यामुळे आपले दुखणे लगेच गायब होईल. जाणून घेऊया त्याबद्दल

21 जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यंदा जगभरात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहे. योगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात. या योगासनातून आपण अनेक आजारांवर (Disease) मात करु शकतो.

1. हलासन कसे करावे ?

  • यासाठी आपल्याला सर्व प्रथम स्वच्छ वातावरण व सपाट जागेवर मॅट पसरवावा लागेल.

  • आता त्यावर पाठीवर झोपा आणि दोन्ही हात चटईवर ठेवा.

  • आता हळू हळू तुमचे पाय सरळ रेषेत वर करा आणि नंतर कंबरेचा आधार घेऊन ते तुमच्या डोक्याच्या मागे घ्या.

  • तोपर्यंत डोक्याच्या मागच्या बाजूला घ्या.

  • तुमचे पाय जमिनीला स्पर्श करेपर्यंत.

  • आता तुमच्या क्षमतेनुसार या आसनात राहा आणि नंतर तुमच्या सामान्य स्थितीत या.

  • हा योग दिवसातून ५ वेळा केल्यास कंबरदुखीपासून आराम मिळेल.

2. हलासनाचे फायदे (Benefits)

1. पचन प्रक्रिया

या योगामुळे आपल्याला बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. तसेच पचनक्रिया देखील सुरळीत होते.

2. वजन कमी करते

वाढत्या वजनामुळे चिंतेत असाल तर वजन कमी करण्यासाठी रोज हलासन करा. एका संशोधनाच्या निकालानुसार, हलासन चयापचय वाढवते आणि चरबी कमी करते.

3. निद्रानाश

निद्रानाशाची तक्रार आहे त्यांच्यासाठी हलासन हा रामबाण उपाय आहे. असे केल्याने निद्रानाश आणि तणाव दोन्ही दूर होतात. त्यासाठी नियमित हलासन केल्यास फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT