International Women's Day 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

International Women's Day 2024: महिलांनो, ८ मार्चला भारतातील या ठिकाणी फिरा फुकटात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Womens Day Special Tour : या दिवशी भारतात अनेक ठिकाणी महिलांना फ्रीमध्ये अनेक ठिकाणी फिरता येते. जर तुम्हालाही सोलो ट्रिप करायची असेल तर या ठिकाणी जाऊ शकता.

कोमल दामुद्रे

Women's Day 2024 Special Free Entry Places :

कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना घराबाहेर पडता येत नाही. वर्किंग वूमनला काम आणि घर या दोघांमधून वेळ मिळत नाही. अनेक महिलांना घराबाहेर पडायचे असते, सोलो ट्रिप करायची असते.

फिरायला जायला कुणाला आवडत नाही. आपल्यापैकी अनेक महिलांना फिरायचे वेड असते. नवीन ठिकाणी फिरण्याचा ट्रेंड सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. अनेक महिलांना सोलो ट्रॅव्हलिंगला जायला आवडते.

८ मार्चला दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी भारतात अनेक ठिकाणी महिलांना (Women's) फ्रीमध्ये अनेक ठिकाणी फिरता येते. जर तुम्हालाही सोलो ट्रिप (Trip) करायची असेल तर या ठिकाणी जाऊ शकता.

1. ताजमहल

जर तुम्हाला ताजमहल पाहायचा असेल तर तुम्हाला २०० रुपये खर्च करावे लागणार नाही. ताजमहलमध्ये एन्ट्री करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ५० रुपये मोजावे लागतात. परंतु, महिला दिनानिमित्त (Women's Day) महिलांना फ्रीमध्ये पाहाता येणार आहे.

2. लाल किल्ला

लाल किल्ल्यावर सोमवार ते शुक्रवारी प्रति व्यक्तीला ६० रुपये प्रवेश शुल्क आहे. तर वीकेंडला ८० रुपये शुल्क आकारले जाते. महिला दिनानिमित्त या ठिकाणी फ्रीमध्ये फिरता येईल.

3. कुतुबमिनार

कुतुबमिनार ही विटांनी बांधलेली जगातील सगळ्यात उंच मिनार आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्लीत आहे. हा मिनार पाहायला परदेशातून अनेक लोक येथे येतात. या ठिकाणी भारतीयांसाठी प्रवेश शुल्क ३५ ते ४० रुपये प्रति व्यक्तीसाठी मोजावे लागतात. तर परदेशी पर्यटकांना ५०० रुपये मोजावे लागतात. महिला दिनानिमित्त महिलावर्गांला या ठिकाणी फ्रीमध्ये फिरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT