Rajesh Rawani Saam Tv
लाईफस्टाईल

Rajesh Rawani: ट्रक ड्रायव्हर चक्क व्हिडिओतून कमावतो महिन्याला 10 लाख रुपये, आनंद महिंद्रा यांनीही केलं कौतुक

Rajesh Rawani Inspirational Story: मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस यशस्वी होतो. असंच यश राजेश रवानी याने मिळवलं आहे. राजेश रवानी हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रक ड्रायव्हर असूनही युट्यूबच्या माध्यमातून १० लाख रुपये कमावतात.

Siddhi Hande

प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर एखादा व्यक्ती खूप यशस्वी होते. असंच यश झारखंडमधील रामगढ गावातील राजेशने मिळवलं आहे. राजेश रवानी हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. ट्रक डायव्हर असूनही राजेश दरमहिन्याला लाखो रुपये कमावतो. ट्रक ड्रायव्हर महिन्याला लाखो रुपये कसा कमावतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. याच राजेशच्या यशाच्या प्रवासाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Rajesh Rawani Success Story)

राजेश हा जवळपास २० वर्षांपासून ट्रक चालवतो. ट्रक ड्रायव्हरसोबतच तो एक कन्टेट क्रिएटर आहे. त्याचे युट्यूबवर स्वतः चे चॅनेल आहे. राजेशला खूप आधीपासूनच स्वयंपाकाची आवड होती. तो ट्रक चालवतानादेखील आपली आवड जोपासतो.तो युट्यूबवर स्वयांपाकाचे व्हिडिओ पोस्ट करतो.याच व्हिडिओमधून तो प्रसिद्ध झाला आहे.

राजेशचे युट्यूब चॅनलवर १.८७ दक्षलाखाहून अधिक फॉलोवर्स आहे. तो युट्यूबच्या माध्यमातून दर महिन्याला लाखो रुपये कमावतो.राजेशचे R Rajesh Vlogs या नावाने युट्यूबवर चॅनल आहे. राजेशचा मुलगा त्याचे हे व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करतो. त्याची मेहनत आणि सातत्याने व्हिडिओ बनवण्याची सवय यामुळे तो खूप प्रसिद्ध झाला.

मिडिया रिपोर्टनुसार, राजेश युट्यूबच्या माध्यमातून दर महिन्याला ५ लाख राख रुपये कमावतो. राजेशने या पैशातून त्याचे स्वतः चे घरदेखील बांधले आहे. राजेशने खूप गरीबीतून आपले वेगळे विश्व निर्माण केले आहे. राजेशचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनीदेखील त्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

SCROLL FOR NEXT