Indian Upi Payment Become Global Saam Tv
लाईफस्टाईल

Indian UPI Payment Become Global : भारताचं UPI जगात भारी! भारताच्या ऑनलाइन पेमेंट सिस्टमचं जगात कौतुक

UPI Payment : आजच्या काळात, ऑनलाइन पेमेंट सिस्टम म्हणजेच UPI भारतात खूप लोकप्रिय होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian UPI Payment : भारतीय UPI पेमेंट सिस्टमची विश्वासार्हता वाढत आहे. आजच्या काळात, ऑनलाइन पेमेंट सिस्टम म्हणजेच UPI भारतात खूप लोकप्रिय होत आहे. यासोबतच यूपीआय परदेशातही खूप लोकप्रिय होत आहे.

अलीकडेच, फ्रान्समध्ये UPI पेमेंट चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. फ्रान्सनंतर आता शेजारील श्रीलंकेतही UPI सिस्टम लागू होणार आहे. यापूर्वी UPI पेमेंट सिस्टीम सिंगापूर, UAE, नेपाळ, भूतानमध्ये लागू करण्यात आली आहे.

जगभरात UPI पेमेंट लागू केल्याने भारतीयांना मोठा फायदा (Benefits) होणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या देशात UPI पेमेंट लागू आहे तेथे गेलात तर तुम्हाला पेमेंट करणे सोपे जाईल. तसेच, भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत होईल, कारण भारतातून इतर देशांमध्ये व्यवसाय करणे सोपे होईल. यासोबतच डॉलरवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.

UPI म्हणजे काय?

UPI हा पूर्ण स्वरूपाचा युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणून ओळखला जातो. ही त्वरित पेमेंट प्रणाली आहे. याच्या मदतीने डेली एकमेकांमध्ये ठराविक रक्कम ट्रान्सफर करू शकणार आहे. आज, PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम सेवा भारतात उपलब्ध आहेत.

भारतीय पेमेंट सिस्टम अद्वितीय का आहे?

सध्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम ऑनलाइन (Online) तसेच ऑफलाइन (Offline) मोडमध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ जर तुमच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट नसेल, तरीही तुम्ही इन्स्टंट पेमेंट ट्रान्सफर करू शकाल. यासोबतच तुम्ही स्मार्टफोन तसेच फीचर फोनद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.

त्याचप्रमाणे तुम्हाला 2000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करायचे असल्यास, तुम्ही पिन न टाकताही ऑनलाइन पेमेंट करू शकाल. हे UPI Lite या नावाने सादर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT