What Do the 5 Digits in Your Train Number Actually Mean saam tv
लाईफस्टाईल

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

train number meaning : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकातील प्रत्येक अंक हा केवळ एखादा अंक नसून प्रवासाची संपूर्ण कुंडली सांगणारा एक खास कोड असतो. भारतीय रेल्वेच्या या नंबरिंग सिस्टीममागचे रंजक गणित जाणून घ्या .

Saam Tv

भारतीय रेल्वेने प्रत्येक ट्रेनला दिलेला क्रमांक हा केवळ अंकच नसतो, तर त्या क्रमांकातील प्रत्येक अंकामागे एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो. ट्रेनचा प्रकार, वेग, रेल्वे विभाग आणि त्या विभागातील गाडीचा अनुक्रमांक याची माहिती ट्रेन क्रमांकावरून समजू शकते. त्यामुळे रेल्वेच्या क्रमांकाबद्दल सविस्तर माहताही आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

ट्रेन क्रमांकातील पहिला अंक गाडीचा प्रकार दर्शवतो

साधारणपणे १ किंवा २ या अंकांनी सुरू होणाऱ्या गाड्या लांब पल्ल्याच्या असतात. शून्य या अंकाने सुरू होणाऱ्या गाड्या विशेष गाड्या असतात. यामध्ये सण, उत्सव, सुट्ट्या किंवा परीक्षांच्या काळात सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांचा समावेश होतो. तर ५ या अंकाने सुरू होणाऱ्या गाड्या प्रवासी गाड्यांच्या प्रकारात येतात.

दुसऱ्या अंकावरूनही गाडीबाबत महत्त्वाची माहिती मिळते

काही क्रमांकांमध्ये दुसरा अंक २ असल्यास त्या गाडीचा सुपरफास्ट प्रकाराशी संबंध असतो. राजधानी, शताब्दी आणि दुरंतो यांसारख्या प्रतिष्ठित गाड्यांच्या क्रमांकांमध्येही ही रचना पाहायला मिळते. उदाहरणार्थ, राजधानी एक्स्प्रेसचा क्रमांक १२९५१, तर शताब्दी एक्स्प्रेसचा क्रमांक १२००२ आहे.

यानंतरचा अंक म्हणजेच तिसरा अंक संबंधित रेल्वे झोनची ओळख करून देतो. उदाहरणार्थ, ९ हा अंक पश्चिम रेल्वेशी, ३ हा पूर्व रेल्वेशी, तर ४ हा उत्तर रेल्वेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. शेवटचे दोन अंक संबंधित विभागातील गाडीचा अनुक्रमांक दर्शवतात.

या क्रमांक पद्धतीतील आणखी एक रंजक बाब म्हणजे विषम आणि सम क्रमांक.अनेक मार्गांवर विषम क्रमांकाची गाडी एका दिशेने,तर सम क्रमांकाची गाडी परतीच्या दिशेने धावते. उदाहरणार्थ, १२९५१ मुंबई सेंट्रलहून नवी दिल्लीकडे जाते, तर १२९५२ नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलकडे परत येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरा डोकं चालवा आणि सांगा! या फोटोमध्ये किती घोडे आहेत?

दोन दिवसांत दोन धक्के! माजी आंतरराष्ट्रीय धावपटूचा भाजपला रामराम, प्रदेशाध्यक्षाकडे सोपवला राजीनामा

Vastu Tips : घरातील 'या' पाच ठिकाणी रिकामी भांडी ठेवू नका, नाहीतर येईल नशिबी येईल दारिद्र्य

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात

Dev Diwali Trip: देव दिवाळीला वाराणसीला जाण्याचा प्लॅन करताय? ३ दिवसांत पाहा काशीचे सुंदर घाट, गंगा आरती; असे करा ट्रिपचे नियोजन

SCROLL FOR NEXT