Indian Railway Rule Saam tv
लाईफस्टाईल

Indian Railway Rule : रेल्वेने प्रवास करण्याआधी तिकीटासंबंधी 'हे' नियम जाणून घ्या? अन्यथा जेल आणि दंड दोन्हीचा सामना करावा लागू शकतो

Indian Railway Rule : रेल्वेत तुम्ही जागा अदलाबदल करत असाल तर सावध व्हा. कारण रेल्वेच्या नियमांनुसार हा कायदेशीर गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.

साम टिव्ही ब्युरो

Indian Railway Rule :

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा अनावधाने प्रवाशांकडून काही नियम मोडले जातात. अनेकांना रेल्वेच्या नियमांची माहिती नसते, त्यामुळेही असं होतं. मात्र रेल्वेचे असे काही नियम आहेत, जे सर्वांना प्रवास करण्याआधी माहिती असणे गरजेचं आहे.

तुम्ही मित्रमंडळी किंवा नातेवाईक एकत्र प्रवास करत असाल तर सर्व एकत्र बसण्याचा प्रयत्न करता. मात्र तसं शक्य न झाल्यात तुम्ही जागांची अदलाबदली करुन एकत्र बसण्याचा प्रयत्न करता. तुम्ही जागा अदलाबदल करत असाल तर सावध व्हा. कारण रेल्वेच्या नियमांनुसार हा कायदेशीर गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय शिक्षा होऊ शकते?

भारतीय रेल्वेच्या कलम १४४ अन्वये दोषीला तुरुंगासह दंड भरावा लागू शकतो. तुमची सीट सोडून दुसऱ्या सीट किंवा डब्यात प्रवास करणे हा देखील कायदेशीर गुन्हा आहे ज्यासाठी २५० रुपयांपर्यंत दंड आहे. (Latest Marathi News)

तिकीट विकणे देखील गुन्हा

तुम्ही तुमचे ट्रेनचे तिकीट ब्लॅकमध्ये विकले किंवा तुमचे तिकीट इतर कोणत्याही प्रकारे दुसऱ्याला दिले तर तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. ट्रेनचं तिकिटी रेल्वेच्या माध्यमातूनच विकलं जाऊ शकतं. रेल्वेच्या परवानगीशिवाय तिकीट विक्री केल्या कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या गुन्ह्यात ३ वर्षांचा कारवास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

वेटिंग तिकिटावर प्रवास करणे देखील गुन्हा

वेटिंग तिकिटावर प्रवास करणे हाही गुन्हा मानला जातो. जर तुम्ही कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करत असाल किंवा तुमचे रेल्वे तिकीट रद्द झाले तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. TTE तुमच्याकडून भाडे देखील वसूल करू शकतो किंवा पुढील स्टेशनवर देखील उतरण्यास सांगू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

SCROLL FOR NEXT