Indian Railway Rule Saam Tv
लाईफस्टाईल

Indian Railway Rule : रेल्वेच्या मिडल बर्थ सिटबद्दल माहीत आहे का ? काय सांगतो रेल्वेचा नियम, प्रवाशांनी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Railway Mid Seat : जर तुम्हाला देखील रेल्वेची मिडल बर्थ सिट मिळाली असेल तर रेल्वेचे हे नियम लक्षात ठेवा

कोमल दामुद्रे

Middle Birth Ticket : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला किंवा गावी जाण्यासाठी आपण रेल्वेचे तिकीट बुक करतो. त्यात आपल्याला तिकीट बुक करण्यासाठी काही ऑप्शन दिले जातात. काही लोक यासाठी लोअर बर्थ किंवा अपर बर्थला अधिक प्राधान्य देतात. मग मिडल बर्थला लोक प्राधान्य का देत नाही.

परंतु, काही लोकांना मिडल बर्थची सिट मिळते. मिळालेल्या तिकीटात (Ticket) समाधान प्रवास करण्यासाठी तयार होतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का ? रेल्वेचे असे काही नियम आहे ज्याबद्दल आजही प्रवाशांची अधिक माहीती नाही. जर तुम्हाला देखील रेल्वेची मिडल बर्थ सिट मिळाली असेल तर रेल्वेचे हे नियम (Rule) लक्षात ठेवा.

प्रवासादरम्यान (Travel) आपण पाहिलं असेल की, रेल्वेच्या एका सेक्शनमध्ये लोअर बर्थ, मिडल बर्थ, अपर बर्थ, साइड अप्पर बर्थ आणि साइड लोअर बर्थ असतो. परंतु, तुम्हाला जर मिडल बर्थचे तिकीट मिळाले असेल तर तुम्ही ठरवून देखील वेळेपूर्वी किंवा त्यानंतर त्या सीटवर झोपू किंवा बसू शकत नाही. कारण भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार मधल्या बर्थचा प्रवासी हा त्याच्या सीटवर रात्री 10:00 च्या आधी आणि सकाळी 6:00 नंतर झोपू शकत नाही.

अशा स्थितीत प्रवाशाला दिवसभर थकवा आला असला आणि झोपायची इच्छा असली तरी रात्री दहा वाजेपर्यंत ट्रेनमध्ये बसून राहावे लागते. दुसरीकडे, त्याने रेल्वेचा हा नियम पाळला नाही, तर त्याच्यावरही रेल्वेकडून कारवाई होऊ शकते.

1. टीटीई प्रवाशांना यावेळी त्रास देऊ शकत नाही

बरेचदा टीटीई रेल्वेत आपले तिकीट तपासायला येतो परंतु, तुम्हाला माहीत आहे का ? रेल्वेच्या नियमानुसार टीटीईला फक्त दिवसा तिकीट तपासण्याची मुभा आहे. तिकीट तपासणीच्या नावाखाली ते रात्री १० नंतर तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. TTE तुमचे तिकीट फक्त सकाळी 6:00 ते रात्री 10:00 या वेळेत तपासू शकतो. दुसरीकडे, टीटीईने हा नियम न पाळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajirao Peshwa Statue Controversy : आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा; मस्तानीच्या वंशजांचा दावा

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये पेट्रोलच्या टँकरने दुचाकीस्वार महिलेला चिरडले

Most Dangerous River: भारतातील सर्वात धोकादायक नदी कोणती माहित आहे का?

Shahapur : मित्रांसोबत फिरायला गेला तो परतलाच नाही; भारंगी नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Upvas Medu Vada: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा, फक्त १० मिनिटांत घरी तयार

SCROLL FOR NEXT