15 August Bollywood Songs  Saam TV
लाईफस्टाईल

15 August Bollywood Songs : थेट काळजाला भिडणारी देशावरील सुंदर गाणी; यादी आताच वॉचलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवा

Independence Day Celebration Bollywood Songs : बाजारात सर्वत्र लहान मोठ्या आकारातील तिरंगे विकण्यासाठी आले आहेत. तर अनेक ठिकाणी तिरंगा शेडमधील कपडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. भारत हा विविध जाती धर्मांचा देश आहे.

Ruchika Jadhav

यंदा भारतात ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सर्वांनी आजपासूनच तयारीला सुरुवात केली आहे. बाजारात सर्वत्र लहान मोठ्या आकारातील तिरंगे विकण्यासाठी आले आहेत. तर अनेक ठिकाणी तिरंगा शेडमधील कपडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. भारत हा विविध जाती धर्मांचा देश आहे.

त्यामुळे भारतात विविध संस्कृतींचे सुद्धा दर्शन घडते. अशात आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करताना प्रत्येक ठिकाणी सुंदर गाणी लावली जातात. तुम्ही सुद्धा सेलिब्रेशनची तयारी केली आहे मात्र अजून तुम्ही सुंदर गाण्यांची वॉचलिस्ट सिलेक्ट केलेली नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण यामध्ये आम्ही देश प्रेमावर आधारीत मराठी आणि बॉलिवूडची काही भन्नाट गाणी शोधली आहेत.

ए वतन

आलिया भट्टच्या राजी या चित्रपटातील ए वतन हे गाणं फारच सुंदर आहे. गाणं सुरु होताच अंगावर सरकन काटा उभा राहतो. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हे गाणं प्रचंड गाजलं होतं. बॉलिवूडच्या सूपहिट गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. त्यामुळे तु्म्ही हे गाणं लावू शकता.

लेहरा दो

रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटात लेहरा दो हे गाणं आहे. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने हे गाणं गायलं आहे. त्याच्या आवाजाने गाण्याला आणखी चार चाँद लागले आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातील बोल ऐकून तुम्ही अगदी मंत्रमुग्ध व्हाल. त्यामुळे हे गाणं प्लेलिस्टमध्ये आजच सेव्ह करा.

माँ तुझे सलाम

देश प्रेमावरील माँ तुझे सलाम हे गाणं सुद्धा अंगावर अगदी शहारे येतील असं आहे. ए. आर. रेहमानने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणं १९९७ मध्ये रिलीज झालं. मात्र अद्यापही गाण्याची क्रेझ कायम आहे.

जिंकू किंवा मरू

हिंदीसह मराठीतील गाणी किंवा कविता म्हणून तुम्ही जिंकू किंवा मरू हे गाणं सुद्धा ऐकू शकता. मराठी भाषेत स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी भारतीय काय करू शकतात याचं वर्णन करण्यात आलं आहे. देश प्रेम व्यक्त करताना तुम्ही हे गाणं ऐकू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT