Vitamin D Deficiency Saam Tv
लाईफस्टाईल

Vegan Food For Vitamin D : मांसाहारी पदार्थांचा समावेश न करता असे वाढवा शरीरातील 'ड' जीवनसत्त्व !

जीवनसत्त्व ड चे प्रमाण शरीरात कसे वाढवाल ?

कोमल दामुद्रे

Vegan Food For Vitamin D : शरीराला निरोगी राहण्यासाठी आहाराबरोबर जीवनसत्त्वांची देखील आवश्यकता असते. प्रत्येक जीवनसत्त्वांचे वेगवेगळे महत्त्व आहे. शरीराला इतर जीवनसत्त्वांच्या तुलनेत जीवनसत्त्व ड ची अधिक गरज असते.

मांसाहार करणार्‍यांना जीवनसत्त्व ड सहज उपलब्ध होते. परंतु, त्याच्या तुलनेत शाकाहारी पदार्थांमध्ये याचा पुरवठा होणे थोडे कठीण आहे. ज्यामुळे शाकाहारी लोकांना अशक्तपणा व इतर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

कोलेस्ट्रॉलचे जीवनसत्त्व ड मध्ये रुपांतर करण्यासाठी सूर्यप्रकाश याचे उत्तम स्त्रोत असेल. परंतु, यासाठी सूर्यप्रकाश व शरीराचे कोलेस्ट्रॉल पुरेसे नसते. आपल्याला आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीरात जीवनसत्त्व ड चे प्रमाण वाढेल व आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

१. मशरूम

Mushroom

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मशरूम ही एकमेव अशी वनस्पती आहे. ज्यामध्ये जीवनसत्त्व ड मुबलक प्रमाणात आढळते. मशरूममध्ये जीवनसत्त्व ड-२ असते, तर प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये जीवनसत्त्व ड-३ असते. हे शरीरासाठी चांगले असले तरी यात शरीरातील जीवनसत्त्व भरुन काढण्याची क्षमता असते.

२. ओट्स

Oats

ओटमीलमध्ये जीवनसत्त्व ड देखील पुरेशा प्रमाणात आढळते. ओटमीलच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये ०.२ ते २.५ मायक्रोग्राम (8 ते 100 IU) असतात. एका मायक्रोग्राममध्ये 40 IQ आढळतो, जे जीवनसत्त्व (Vitamins) ड च्या तुलनेत पुरेसे असते. नियमितपणे ओट्सचे सेवन केल्यास फायदा होतो.

३. संत्र्याचा रस

Orange Juice

संत्र्याच्या रसातून अनेक पोषक घटक मिळतात. बळकट असलेल्यांमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व ड आढळते. सामान्य शाकाहारी आहारात जीवनसत्त्व ड मुबलक प्रमाणात आढळत नाही, परंतु खाद्यपदार्थ खरेदी (Shopping) करताना, त्यात फोर्टिफाइड जीवनसत्त्व ड आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांचे पॅकेजिंग तपासा.

४. चीज

Cheese

चीज हा जीवनसत्त्व ड चा नैसर्गिक स्त्रोत आहे. यात जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण नसले तरी शरीरासाठी फायदेशीर आहे. फॉन्टिना, मॉन्टेरी आणि चेडर यामध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्व आढळतात. तर कॉटेज, रिकोटा किंवा क्रीम चीजमध्ये जीवनसत्त्व आढळत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT