Bad cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Bad cholesterol: दररोजच्या आहारात करा या 3 भाज्यांचा समावेश; नसांना चिकटलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल काढतील बाहेर

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी करून बीट, ब्रोकोली आणि पालकासारख्या फायबरयुक्त भाज्यांचा आहारात समावेश करता येतो. जाणून घ्या या भाज्यांचे संभाव्य फायदे आणि योग्य आहाराचे महत्त्व.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीच्या आहारामुळे अनेकांना बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या जाणवते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त योग्य प्रमाणात पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हृदयावर अधिक ताण येतो. परिणामी हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्यासोबतच आहारातही आवश्यक बदल करणं गरजेचं आहे. जंक फूड, फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ कमी करून रोजच्या जेवणात पौष्टिक भाज्यांचा समावेश करता येतो. बीट, ब्रोकोली आणि पालक या भाज्या आहारासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

या पदार्थांचं सेवन टाळा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असेल तर जंक फूड, फास्ट फूड आणि जास्त तेलात तळलेले पदार्थ शक्य तितके टाळणं गरजेचं आहे. अशा पदार्थांऐवजी फायबर आणि पोषक घटकांनी युक्त भाज्यांचा आहारात समावेश करावा.

बीट

बीट हे पोषक घटकांनी समृद्ध आहे. बीटमध्ये सोल्युबल फायबर आणि नायट्रेट्स आढळतात. सोल्युबल फायबर कोलेस्ट्रॉलच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे आहारात नियमितपणे बीटचा समावेश केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. बीट सलाड किंवा इतर पदार्थांमधून खाता येतं.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. आहारातील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतं. ब्रोकोलीमध्ये आढळणारे फायटोकेमिकल्स हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात. ब्रोकोली उकडून किंवा वाफवून सलाडच्या स्वरूपात खाल्ली जाऊ शकते.

पालक

पालक ही हिरव्या पालेभाज्यांपैकी एक पौष्टिक भाजी आहे. पालकामध्ये फायबरसह विविध पोषक घटक आढळतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून पालकाचा समावेश करता येतो. पालकाची भाजी, सूप किंवा इतर पदार्थांमध्ये पालक वापरता येतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ एका भाजीवर अवलंबून राहण्यापेक्षा संपूर्ण आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तळलेले आणि फास्ट फूड कमी करून पौष्टिक भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याची चांगली काळजी घेता येऊ शकते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT