Kitchen Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Vastu Tips: घरात कोणत्या दिशेला पाण्याचा नळ असावा? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

Kitchen Vastu Rules: वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये पाण्याचा नळ, सिंक आणि पाणी साठवण्याची जागा कोणत्या दिशेला असावी? फ्रिज, मिक्सर, मायक्रोवेव्ह यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य मांडणी कशी करावी? स्वयंपाकघरातील पाणी आणि अग्नीशी संबंधित महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

घरातील किचन म्हणजेच स्वयंपाकघर ही अत्यंत महत्त्वाची जागा असते. घरात रोजचा स्वयंपाक, जेवणाची तयारी आणि इतर अनेक कामं किचनमध्ये केली जातात. त्यामुळे किचनची रचना आणि तिथल्या वस्तूंची मांडणी योग्य असावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय. किचनमधील पाण्याचा नळ, सिंक आणि पाणी ठेवण्याची जागा कोणत्या दिशेला असावी, याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.

किचनमध्ये पाण्याचा नळ कोणत्या दिशेला असावा?

वास्तुशास्त्रानुसार, किचनमधील सिंक, पाण्याचा नळ आणि पाणी साठवून ठेवण्याची जागा उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावी. म्हणजेच उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मधल्या भागात या वस्तू ठेवणे योग्य मानले जाते. हा नियम स्वतंत्र घर आणि फ्लॅट अशा दोन्ही ठिकाणी लागू होतो.

तुमचं स्वयंपाकघर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात असलं तरी पाण्याचा नळ, सिंक आणि पाण्याचा कंटेनर उत्तर ते पूर्व या दिशांच्या दरम्यान असावा, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय. या नियमात कोणत्याही प्रकारचा बदल करू नये किंवा दुर्लक्ष करू नये, असंही सांगितलं जातं.

किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात?

किचनमध्ये फ्रिज, मिक्सर, ग्राइंडर, टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, एअर फ्रायर आणि आरओ वॉटर प्युरिफायर अशा अनेक वस्तू असतात. वास्तुशास्त्रानुसार, पाणी आणि विजेवर चालणाऱ्या वस्तूंची जागा ठरवताना योग्य दिशेचा विचार करावा. विजेवर चालणारी उपकरणे दक्षिण दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं. पण मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशा योग्य असल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे काही उपकरणं पश्चिम दिशेलाही ठेवता येतात.

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशेला काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं. दक्षिण-पश्चिम दिशेला स्वयंपाक करण्याची जागा योग्य नसल्याचंही सांगितलं जातं.

किचनमध्ये जेवण केल्याने काय फायदे होतात?

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील अग्नीला महत्त्वाचं स्थान दिलं जातं. अग्नीला मंगल मानलं जातं. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, अग्नीचा संबंध मंगळ आणि राहू यांच्याशी जोडला जातो. अग्नीच्या योग्य व्यवस्थेमुळे राहूचा प्रभाव नियंत्रणात राहतो, असं सांगितलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Elections : जिल्हा परिषद-पंचायत समितीमधील SC/ST आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल, कोर्टात नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update: ऊस दरवाढीसाठी सोलापूरात स्वाभिमानीचा मोर्चा

महिलांसाठी नारायण पेठ पैठणी साडीच्या लेटेस्ट डिझाईन्स, ५ पॅटर्न्स नक्की ट्राय करा

अजित पवारांच्या पुतळा अनावरणाला तटकरे, पटेलांची पाठ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट; आरोपीचं थेट बिष्णोई गँगसोबत कनेक्शन

SCROLL FOR NEXT