China  saam tv
लाईफस्टाईल

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

China children: मुलांचे रचनात्मक, भावनिक, शारीरिक आणि कलात्मक विचार वाढवण्यासाठी त्यांना शाळेत पाठवणे खूप महत्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांचे रचनात्मक, भावनिक, शारीरिक आणि कलात्मक विचार वाढवण्यासाठी त्यांना शाळेत पाठवणे खूप महत्वाचे आहे. जगातील देशांबद्दल बोलायचे झाले तर सर्वजण चीनच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक करतात. याचे कारण म्हणजे येथील शाळा मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर उपक्रमांच्या माध्यमातून जीवनातील आव्हानांना तोंड द्यायला शिकवतात.

इथे शाळांमध्ये मुलांना लहानपणापासूनच जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. मुलांना पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी शिक्षक जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी शिकवतात. येथे अभ्यासासोबत वर्गांमध्ये मुलांना भारतीय मुले मोठी झाल्यावर काय शिकतात ते शिकवले जाते. जाणून घेऊया चीनमधील ॲक्टिव्हिटी क्लासेस कसे आहेत.

मनोरंजक ॲक्टिव्हिटी

चीनमध्ये बालवाडी ॲक्टिव्हिटी वर्ग मनोरंजक आहेत. येथे मुलांना कला आणि खेळांच्या माध्यमातून जीवनाचा शोध घेण्यास शिकवले जाते. येथील उपक्रम वर्गात मुलांच्या कल्पनाशक्तीना वाव मिळताना दिसून येतो.

चीनमध्ये लहान मुले शिजवतात अन्न

अनेक व्हिडिओंमध्ये लहान वयात मुलं स्वयंपाक शिकत असल्याचे तुम्हाला दिसेल. कोणी भाजी शिजवत आहे, तर कोणी ती कापून त्यात मसाले कसे घालायचे हे शिकत आहे. येथे मुलांना वर्गात फूड प्रेझेंटेशन बद्दल शिकवले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु येथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचा एक छोटा स्टोव्ह आहे, ज्यावर तो दररोज स्वतःचे अन्न शिजवतो.

शिवण काम

चीनमध्ये मुलांना सुरुवातीपासूनच शिकवले जाते की कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. आयुष्यात केवळ अभ्यासच नाही तर घरातील कामे शिकणेही महत्त्वाचे आहे, मग ती मुलगी असो वा मुलगा. त्यामुळे येथे उपक्रमाच्या नावाखाली मुलांना शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकवले जाते.

अवघड कामे

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथे ३ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना अवघड कामे हाताळायला शिकवले जातात. यासाठी सहसा कोडी वापरली जातात. भारतात जे काम मुलांना मोठं होऊनही शिकता येत नाही, त्याचं प्रशिक्षण इथल्या मुलांना अगदी लहानपणापासूनच दिलं जातं. जेणेकरून ते स्वावलंबी होऊन जीवनात येणाऱ्या काही समस्या सोडवायला शिकतील.

Edited by-Archana Chavan

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT