Gauva Benefits For Diabetes Control 
लाईफस्टाईल

Gauva Benefits For Diabetes Control: डायबिटीजच्या रूग्णांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, पेरू खाताना 2 चुका टाळा नाहीतर, रक्तातील साखर वाढेल

डायबिटीसच्या रुग्णांनी पेरू खाताना कोणत्या चुका टाळाव्यात? पेरूची साल काढून खाल्ल्याने साखर का वाढते आणि पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.

Manasvi Choudhary
  • पेरू हे डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर फळ मानले जाते. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

  • पेरू खाताना काही चुका करणे टाळावे नाहीतर आरोग्यावर परिणाम होतो.

  • पेरूची साल काढून खाल्ल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो.

  • योग्य पद्धतीने पेरू खाल्ल्यास इम्युनिटी वाढण्यासह आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Health Benefits Of Guava: पेरू हे आरोग्यासाठी उत्तम आणि पौष्टिक फळ मानले जाते. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायद्याचे आहे. तसेच या फळामध्ये फायबरचे प्र्माण अधिक असल्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे फळ गुणकारी ठरू शकते. मात्र, पेरू खाताना काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्याऐवजी वाढू शकते.

पेरू खाताना कोणत्या 2 चुका टाळाव्यात

पेरूची साल काढून खाणे टाळा

अनेकांना फळे सोलून खाण्याची सवय असते, पण पेरूच्या बाबतीत ही सवय चुकीची ठरू शकते. पेरूच्या सालीमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, जे साखरेचे शोषण मंदावते. साल काढून खाल्ल्याने पिकलेल्या पेरूतील साखरेचा प्रभाव शरीरावर होतो आणि ब्लड शुगर वाढू शकते.

अतिपिकलेला किंवा जास्त गोड पेरू खाणे टाळा

कच्चा पेरूच्या तुलनेत जास्त पिकलेल्या पेरूमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी नेहमी मध्यम किंवा कच्चा-पिकलेला पेरू खाणे अधिक सुरक्षित मानले जाते.

डायबिटीससाठी पेरूच्या पानांचे फायदे

फळाप्रमाणेच पेरूची पाने देखील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानली जातात. पेरूच्या ५ ते १० पानांचा चहा किंवा रस करून प्यायल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पेरू खाण्याचे इतर प्रमुख फायदे (Health Benefits Of Eating Guava)

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते: यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

  • हृदयाचे आरोग्य: पोटॅशियममुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • त्वचा आणि केस: व्हिटॅमिन सीमुळे त्वचा नैसर्गिकरीत्या ग्लो करते.

टिप: येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शरद पवारांची भेट घेणार

PM Kisan Yojana : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होणार? 24व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Malai Kofta Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट बनवा हॉटेलस्टाईल क्रीमी आणि चविष्ट मलाई कोफ्ता, वाचा रेसिपी

Political News : भाजपसोबत आणखी एक पक्ष करणार युती, अमित शाहांनी दिले संकेत

SCROLL FOR NEXT