Manasvi Choudhary
आजकाल डायबिटीजचा त्रास अनेकांना होत आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी काही ड्रिंक्सचे सेवन करणे महत्वाचे आहे.
रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी ५ हेल्दी ड्रिंक्स कोणते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि क्रोमियम असते, जे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधरवतात. सकाळी रिकाम्यापोटी आवळा ज्यूस पिणे महत्वाचे आहे.
बार्ल्याच्या पाण्यात फायबर असते, जे शरीरात ग्लुकोजचे शोषण मंदावते यामुळे रक्तातील साखरेवर कोणताही परिणाम होत नाही. बार्ले दाणे पाण्यात उकळून ते पाणी गाळून दिवसभरात थोडे-थोडे प्यावे.
मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.