Igatpuri Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Igatpuri Tourism : किल्ले, धबधबे, धरण अन् बरंच काही; या वीकेंडला मित्रांसह करा जिवाची 'इगतपुरी'

Igatpuri Tourist Place : या वीकेंडला तुम्ही बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही इगतपुरीला नक्की भेट देऊ शकता.

Ruchika Jadhav

महाराष्ट्रातील हिल स्टेशनमध्ये इगतपुरीचा समावेश आहे. पश्चिम घाटात सहद्रीच्या टेकड्यांवर असलेले इगतपुरी शहर त्याच्या आकर्षक सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुंदर आणि मनमोहक दृश्यांमुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेले इगतपुरी प्रेक्षकांसाठी लोकप्रिय झाले आहे. अनेक पर्यटकांचे इगतपुरी हे सुखद आश्रयस्थान बनले आहे. रोजच्या धावपळीतून सर्वच त्रासलेले असतात. बऱ्याच पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात फिरायला फार आवडत असते. जर तुम्हालाही अशी एक छोटी ट्रिप काढायची असेल तर इगतपुरी हिल स्टेशनला नक्की भेट द्या.

इगतपुरीमध्ये पर्यटकांना अनेक किल्ले, पर्वत रांगा, धबधबे, मंदिरे, निर्मळ जंगले पाहायला मिळू शकतात. त्याच बरोबर मनाची शांती आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला एकांत अनुभवायला मिळेल. इगतपुरीमधील ठिकाणांना एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही ३ मार्गानीं प्रवास करु शकता.जसे की, मुंबईतील सर्वात जवळ असलेले छत्रपती शिवाजी विमानतळ तेथे जावून तुम्ही हवाई मार्गाने प्रवास करु शकता. रेल्वेस्थानक ही सर्व पर्यटकांसाठी फार सोयीस्कर असलेले स्थानक आहे. म्हणून तुम्ही मुबंई ते इगतपुरी रेल्वे प्रवास करु शकता. इगतपुरीला जाण्यासाठी तुम्ही बसने ही प्रवास करु शकता.

तुम्हाला मुंबईवरुन ३७ किलोमीटर दूर शहापूर शहराला जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला शहापूरवरुन अनेक बसव्यवस्था इगतपुरीला जाण्यास मिळतील. ज्याने तुमचा मार्ग खूप सोपा होईल. तुम्ही ही इगतपुरी शहराच्या प्रेक्षणीय स्थळाचं नियोजन करत असाल तर ही यादी तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल.

त्रिंगलवाडी किल्ला

त्रिंगलवाडी किल्ला तुम्हाला मंदिराच्या सावलीत पाहायला मिळेल. हा किल्ला जमिनीपासून ३००० मीटर उंचीवर आहे. किल्ल्याच्या उंचीवरुन कोकण- नाशिकचा संपूर्ण परिसर दिसतो. त्रिंगलवाडी किल्ल्याला दहाव्या शतकात बांधलेले आहे. हा किल्ला अनेक पर्यटकांसाठी एक आवडीचं पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय ठरला आहे. त्रिंगलवाडी किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान येतात.

विहिगाव धबधबा

निसर्गाच्या सानिध्यात आणि वीकेंडचा पूर्णपणे आनंद लुटण्यासाठी विहिगाव धबधबा अनेक पर्यटकाचं आदर्श ठिकाण बनलं आहे. हा धबधबा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून १२० फुटांवरुन पडणाऱ्या पाण्याने आणि जंगलातील शांततेसाठी प्रसिध्द आहे. विहिगाव धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांना आर्धा तास वेळ लागतो. घनदाट जंगलातून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना खुश ठेवण्याचे काम करत असतो.

कळसूबाई शिखर

सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अनेक पर्वत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर खूप प्रसिध्द आहे. कळसूबाई शिखराच्या खाली म्हणजे गावात माँ कळसूबाईचे मंदिर आहे. या मंदिराला भेट देताना एका वेळी तीनच लोक जाऊ शकता. कळसूबाई शिखराला 'एव्हरेस्टचे शिखर' म्हणून ही ओळखले जाते. या शिखरावर पोहचणे खूप अवघड आहे.

विपश्यना केंद्र

विपश्यना केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार एका मोठ्या गोल्डन पॅगोडासाठी खूप प्रसिध्द आहे. हे विपश्यना केंद्र धम्म इगतपुरी शहरात आहे. या विपश्यना केंद्राला भेट देण्यासाठी तुम्ही इगतपुरी स्टेशनवरुन ऑटो, टॅक्सीने जाऊ शकता. हे केंद्र पाहण्याची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4:30 अशी आहे. हे पर्यटन स्थळ अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते.

भावली धरण

महारष्ट्रात इगतपुरी येथे भावली धरण बांधलेले आहे. भावली धरण ५०९० फूट खोल लांबीमुळे प्रसिध्द आहे. अनेक पर्यटकांच्या सुट्टीतील भावली धरण शांततेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. या धरणाच्या आजूबाजूला अनेक पिकनिक स्पॅारट्स पाहायला मिळतील. भावली धरणाला भेट देण्यासाठी पर्यटक सुमारे १०० पायऱ्या चढून जातात. ह्या धबधब्याचा भरपूर आनंद घेण्यासाठी तुम्ही पावसाळ्याच्या महिन्यात या धरणाला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT