How to keep shine your white clothes ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पांढऱ्या कपडयांची चमक टिकवायची आहे तर, अशी घ्या काळजी

पांढऱ्या कपड्यांची चमक टिकवण्यासाठी हे उपाय करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या आवडी-निवडीत साधारणतः पांढऱ्या कपड्यांना अधिक पसंती मिळते परंतु, त्याची काळजी कशी घ्यावी, त्याच्या रंगाबरोबर चमक कशी टिकवून ठेवावी हा प्रश्न आपल्याला पडतो. पांढऱ्या कपड्यांची देखभाल थोडी अधिक काळजीपूर्वक करावी लागते. त्याचबरोबर इतर रंगांच्या कपड्यांपासून ते वेगळे ठेवावे लागतात परंतु, अनेकवेळा पांढऱ्या कपड्यांची काळजी घेऊनही त्याला थोडा पिवळसरपणा असतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला अशा युक्त्या सांगणार आहोत, ज्याद्वारे पांढरे कपडे नेहमी पांढरे आणि नवीनसारखे राहतील. तर जाणून घेऊया.

हे देखील पहा -

पांढऱ्या कपडयांची चमक टिकवण्यासाठी हे उपाय नक्की करा.

- पांढऱ्या कपड्यांचे पिवळे होणे काही काळानंतर दिसून येते. पांढऱ्या कपड्यांचा सतत वापर केल्यामुळे, आपल्या शरीरातील तेल आणि घामामुळे कपडे हळूहळू पिवळे किंवा राखाडी होतात. त्यामुळे पांढरे कपडे एकदा किंवा दोनदा घातल्यानंतरच धुवा आणि शक्य असल्यास पांढरे कपडे जास्त वापरू नका.

- अनेक वेळा (Time) केचप, कॉफी (Coffee) किंवा तेलाचे (Oil) डाग पांढऱ्या कपड्यांना लागतात, त्यामुळे ते घालता येत नाही. पांढऱ्या कपड्यांवरील अशा प्रकारचे डाग काढून टाकण्यासाठी फॅब्रिक व्हाइटनर वापरू शकता. एका भांड्यात फॅब्रिक व्हाइटनर घेऊन त्यात कापडाला असलेला डागाचा भाग बुडवा आणि २० मिनिटानंतर ते डिटर्जंटमध्ये व्यवस्थित धुवा. असे केल्यास कपडे पुन्हा नव्यासारखे चमकतील.

- काही लोक कपडे व्यवस्थित धुण्यासाठी अधिक डिटर्जंटचा वापर करतात. पण आवश्यकतेपेक्षा जास्त डिटर्जंटने कपडे धुतल्यास कपडे अधिक काळ टिकत नाही आणि कपड्यांचे आयुष्य देखील कमी होत जाते. तसेच डिटर्जंटमुळे ते व्यवस्थित धुतले जात नाही. त्यामध्ये जास्त धूळ चिकटते, त्यामुळे कपडे धुताना कधीही जास्त डिटर्जंट वापरू नका.

- फक्त पांढरे कपडेच नाही तर इतर सर्व कपडे देखील नेहमी सूर्यप्रकाशात वाळवावेत. खरेतर, सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशाने कपड्यांना चमक मिळते. उन्हात कपडे वाळवल्याने कपडे नीट सुकतातच, पण सूर्यप्रकाशामुळे पांढरे कपड्यांची चमक टिकण्यास मदत होते.

अशाप्रकारे तुम्ही पांढऱ्या कपड्यांची काळजी घेऊ शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT