Kidney Damage Symptoms on face saam tv
लाईफस्टाईल

kidney failure: डोळ्यांमध्ये या ४ समस्या दिसल्या तर समजा किडनी निकामी होतेय; उशीर होण्यापूर्वी लक्षणं ओळखा

Kidney disease warning signs: किडनीचे आजार सुरुवातीला सहज लक्षात येत नाहीत. मात्र शरीरातील काही बदल हे गंभीर आजाराची चिन्हे असतात. विशेषतः डोळ्यांमध्ये दिसणारी काही लक्षणं किडनी निकामी होण्याचे संकेत देतात.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचं काम करते. शिवाय ती इलेक्ट्रोलाइट संतुलन राखून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. चुकीच्या जीवनशैली आणि आहारामुळे, आपण नकळत आपल्या किडनीचं मोठं नुकसान करतो असतो.

दरम्यान किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास त्याची लक्षणं ही दिसून येतात. मात्र अनेकांचा असं वाटतं की, केवळ लघवीच्या रंगावरून किडनी डॅमेज झाल्याचं दिसून येतं. मात्र किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास त्याचे परिणाम डोळ्यांमध्येही दिसून येतात. डोळ्यांमध्ये नेमकं काय दिसून येतं ते पाहूयात.

डोळ्यांच्या खाली सूज येणं

किडनीच्या समस्येचं सर्वात पहिलं आणि सामान्य लक्षण म्हणजे डोळ्यांखाली आणि आजूबाजूला सूज येणं. याला पेरीऑर्बिटल एडेमा असंही म्हणतात. ज्यावेळी किडनी शरीरातून प्रोटीन बाहेर टाकण्यास सुरुवात करते तेव्हा डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. सकाळच्या वेळी हे लक्षण अधिक प्रमाणात दिसतं.

डोळ्यांमध्ये ड्रायनेस आणि खाज येणं

किडनीवर कोणताही परिणाम झाला तर शरीरातील खनिजं आणि पोषक तत्वांचा समतोल बिघडतो. रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसची असामान्य पातळी डोळ्यांच्या आर्द्रतेवर परिणाम करते. ज्यामुळे जळजळ, कोरडेपणा आणि सतत खाज येण्याची समस्या जाणवू शकते.

डोळे लाल होणं

किडनी निकामी झाल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझ्मवर परिणाम होतो. अशावेळी डोळ्यांच्या पांढऱ्या भागात कॅल्शियम आणि फॉस्फेट क्रिस्टल्स जमा होऊ शकतात. ज्यामुळे डोळे लाल दिसू शकतात. अनेकदा एखाद्या एलर्जीमुळेही डोळे लाल होऊ शकतात.

धुसर दिसणं

डायबेटीस आणि हाय ब्लड प्रेशर ही किडनी डॅमेज होण्याची मुख्य कारणं आहेत. या दोन्ही स्थिती डोळ्याच्या रेटिनाला नुकसान पोहोचवतात. ज्यावेळी किडनी योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा शरीरात द्रव जमा झाल्यामुळे लेन्सचा आकार बदलू शकतो. परिणामी तुमच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होऊन धुसर दिसून शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitrupaksha And Crow Importance: पितृपक्षात कावळ्याला अन्न का दिले जाते? कावळ्याचे एवढे महत्व का? समजून घ्या

Badlapur News : बदलापुरात चाललंय काय? आधी सभापतींना धक्काबुक्की, आता कंत्राटावरून सभापती-पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट?

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कवर उद्या सीजीपेचे आंदोलन

Skin Care: चेहरा हायड्रेट आणि ग्लोईंग पाहिजे? मग रोज रात्री लावा 'ही' २ मिनिटात तयार होणारी पेस्ट

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत पहिलं बंडाचं निशाण; शिंदेसेनेत उफाळली नाराजी, निष्ठावंतानं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT