Heart artery blockage signs saam tv
लाईफस्टाईल

Heart blockages warning signs: हार्ट ब्लॉकेज आहेत, आधीच मिळतात हे ५ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका

Early symptoms of heart blockages: हृदयविकार हा आजार अचानक होत नाही. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते आणि त्याची काही लक्षणे शरीरात आधीच दिसू लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयातील ब्लॉकेजमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हृदयातील ब्लॉकेजला वैद्यकीय भाषेत Coronary Artery Disease (CAD) असं म्हणतात. ही परिस्थितीत तेव्हा उद्भवते ज्यावेळी हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी अरूंद होते. त्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह पुरेसा न होता हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

मात्र कोणतीही समस्या असल्यास आपलं शरीर आपल्याला संकेत देत असतं. त्याचप्रमाणे हृदयाच्या नसा किंवा धमन्या ब्लॉक झाल्या की हृदयात ब्लॉकेज निर्माण होतात. अशावेळी शरीराद्वारे की काही विशिष्ट प्रकारची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.

हृदयातील ब्लॉकेजची काय आहेत लक्षणं

छातीत वेदना किंवा अस्वस्थता (Angina)

हार्टमध्ये ब्लॉकेज होण्याचं हे सर्वात सामान्य लक्षण आहे. यावेळी रूग्णाला छातीत दडपण, जडपणा जाणवू शकतो. हा त्रास शारीरिक श्रम किंवा मानसिक तणावामुळे होऊ शकतो.

श्वास घेण्यास त्रास

अगदी थोडं चालल्यावरही किंवा जिना चढल्यानंतर तुम्हाला त्रास होत तर सावध व्हा. कारण याचा अर्थ असा असतो की तुमत्या हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाहीये.

हात, मान, जबडा किंवा पाठीमध्ये वेदना

हृदयाच्या समस्यांशी संबंधित वेदना नेहमी छातीतच जाणवतात असं नाही. हात, मान, जबडा किंवा पाठीमध्येही वेदना जाणवू शकतात. या वेदनांना लोकं अनेकदा मसल पेन समजतात.

थकवा किंवा अशक्तपणा

साध्या किंवा छोट्या कामांनीही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याचं हे लक्षण आहे. यावेळी तुम्ही डॉक्टरांची मदत घ्यावी.

अनियमित हृदयाचे ठोके

हृदयाचे ठोके अचानक वाढणं, धडधडणं असं वाटलं तर ते ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. यावेळी जर तुम्हीला भीती आणि अस्वस्थता जाणवली तर सावध व्हा.

हृदयात ब्लॉकेजस का होतात?

हृदयातील ब्लॉकेज Atherosclerosis मुळे होतात. यामध्ये धमनींच्या आतील वॉलवर प्लाक जमा होतो. हळूहळू यामुळे धमनी अरुंद होते आणि हृदयाला जाणारा रक्तप्रवाह कमी होतो.

हृदयात ब्लॉकेज होण्याची कारणं

  • जास्त कोलेस्ट्रॉल

  • उच्च रक्तदाब

  • धूम्रपान

  • मधुमेह

  • लठ्ठपणा

  • शारीरिक हालचालींचा अभाव

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार; मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान

Home Workout की Gym, वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन आहे सर्वात बेस्ट?

MLC Election: राज्यात पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स', महायुतीचे शेकडो नगरसेवक ठाण्यात; राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT