Diabetes symptoms saam tv
लाईफस्टाईल

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Diabetes symptoms: वयाच्या ४० नंतर म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात.  रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये मधुमेह, थायरॉईड आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेहाचा महिलांच्या शरीरावर तसेच त्यांच्या शारीरिक संबंधांवर परिणाम होतो.  वयाच्या चाळीशी नंतर योनीमध्ये वारंवार जखमा होणं किंवा इन्फेक्शन होणं हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं.

वयाच्या ४० नंतर म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात.  रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये मधुमेह, थायरॉईड आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.  महिलांचे हे वय खूपच नाजूक असते, त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असते. स्त्रियांच्या शरीरावर हार्मोन्सचा परिणाम प्रत्येक वयात होतो.

मासिक पाळीच्या सुरुवातीपासून गर्भधारणेपर्यंत, प्रसूतीनंतर आणि रजोनिवृत्तीच्या काळातही हार्मोन्समुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात.  रजोनिवृत्ती सामान्यतः ५० ते ५५ वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये येते.  हे असे वय असते जेव्हा महिलांना अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक समस्यांमधून जावे लागते.

शारीरिक संबंधांवर मधुमेहाचा परिणाम

रजोनिवृत्तीचा महिलांच्या शारीरिक संबंधांवरही परिणाम होतो.  शरीरात इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे महिलांना कामवासनेची कमतरता जाणवू लागते, म्हणजेच शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते.  पण काहीवेळा शारीरिक संबंधांची इच्छा नसणे हे मधुमेहाचेही कारण असू शकते.  जर स्त्रीच्या शरीरात साखरेची पातळी जास्त असेल तर तिला शारीरिक संबंधांची इच्छा नसते.  संभोग करताना, तिला योनीमध्ये जखम होऊ शकते किंवा योनिमार्गात संसर्ग देखील होऊ शकतो.

योनिमार्गाच्या संसर्गामध्ये रक्त तपासणी कधी आवश्यक असते?

वयाच्या ४० व्या वर्षी जर एखाद्या महिलेला वारंवार गर्भाशय ग्रीवाची झीज होत असेल, योनीतून स्त्राव होत असेल, संसर्ग होत असेल किंवा जखमा होत असतील तर तिने तिची रक्त तपासणी करून घ्यावी.  मधुमेहामुळे या समस्या उद्भवत असतील, तर संसर्गासोबतच मधुमेहावर उपचार सुरू करा.  साखरेची पातळी नियंत्रणात राहिल्यास या समस्याही दूर होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT