Protein Deficiency
Protein Deficiency  Saam Tv
लाईफस्टाईल

Protein Deficiency : 'ही' लक्षणे जाणवत असल्यास वेळीच व्हा सावध ! असू शकते प्रोटीनची कमतरता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Protein Deficiency Causes : आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. अमिनो ॲसिडपासून बनलेले प्रोटीन शरीरातील प्रत्येक पेशीचा भाग आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वांपैकी प्रोटीन एक आहे. हे स्नायूंसाठी बिल्डिंग बॉक्स म्हणून ओळखले जाते.

त्यासोबतच शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि हार्मोन्सच्या समस्या दूर करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या लक्षणाबद्दल (Symptoms) सांगणार आहोत.

खूप भूक -

वेळेवर जेवण (Diet) करूनही जर तुम्हाला भरपूर भूक लागत असेल किंवा सतत काहीतरी खावेसे वाटत असेल. तर हे शरीरातील प्रोटीनच्या कमतरता असण्याचे लक्षण आहे.

कमजोरी आणि थकवा -

अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे या समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळणे गरजेचे असते. शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते तेव्हा आपले स्नायू प्रोटीनची गरज भागवते. परिणामी स्नायूंना इजा होऊ लागते त्यामुळे हळूहळू शरीर कमजोर होते. त्यासोबतच थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

दुखापत बरी होण्यास वेळ लागणे -

अपघातामुळे झालेली दुखापत किंवा तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल तर ती जखम बरी होण्यास भरपूर वेळ घेत असेल. तर याचे कारण शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते. शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्याने जखम भरून येण्यास फार वेळ लागतो.

कमकुवत रोगप्रतिकारशक्ती -

शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्याने तुम्ही सारखे आजारी पडू शकता. रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक असलेले प्रोटीनचे प्रमाण शरीरात कमी झाल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकारक पेशी अमिनो ॲसिडपासून बनलेल्या असतात. हे एक प्रकारे प्रोटीन आहे. त्यामुळे शरीरातील योग्य प्रमाणत असलेले प्रोटीन वायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण टाळते.

त्वचा, केस आणि नखांच्या समस्या -

शरीरातील प्रोटीनचा कमतरतेचे परिणाम त्वचा, केस आणि नखांवर होतो. नखे कमकुवत होणे, त्वचा कोरडी होणे आणि केस गळणे या समस्यांना सामोरे जावे लागते. कारण केस, नखे आणि त्वचा विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन जसे की कोलेजण आणि कोराटीनने बनलेले असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT