Migraine tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त आहात, तर असा मिळवा आराम

मायग्रेनचा त्रास होत असेल तर ह्या टिप्स फॉलो करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मायग्रेन हा डोकेदुखीचा एक भाग आहे. हा त्रास डोक्याच्या एका बाजूला होतो आणि त्या वेळी उलट्या, मळमळ आणि चक्कर येते. काहीवेळा हा त्रास दिवसभर राहतो, त्यामुळे आपल्याला काम करावेसे वाटत नाही. काहीवेळेस या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण त्यावर औषधे घेतो, परंतु औषधांचे वारंवार सेवन करणे शरीरासाठी देखील चांगले नाही. यावर काही टिप्स अवलंबून मायग्रेनचे दुखणे कमी करू शकतात.

हे देखील पहा -

मायग्रेनची लक्षणे -

हल्ली मायग्रेनची समस्या लहान मुले, किशोरवयीन, तरुण आणि प्रौढ यांच्यात अधिक प्रमाणात दिसून येत आहे. जर आपले अर्धे डोके दुखत असेल आणि ही समस्या वारंवार होत असेल, तर हा मायग्रेनचा त्रास असू शकतो. अशावेळी मळमळ, उलटी होणे, बोलताना त्रास होणे, दृष्टी कमी होणे, डोक्यात तीव्र वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी टिप्स

१. जेव्हा मायग्रेनचा त्रास (Pain) होतो तेव्हा आपल्यातला आवाज आणि डोळ्यातल्या (Eye) प्रकाशाची संवेदनशीलता वाढू लागते. त्यामुळे डोकेदुखी आणखी तीव्र होते. अशावेळी एकांतात राहा. ज्या ठिकाणी शांतता किंवा प्रकाश नसेल अशा खोलीत दोन ते तीन तास बसून रहा. थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे वेदना कमी होण्याचा प्रयत्न होईल.

२. मायग्रेनचा त्रास वाढू लागला की, डोक्याला हलक्या हाताने मसाज करावा.

३. अशावेळी कपाळावर आणि मानेच्या मागील बाजूस गरम किंवा थंड (Cold) कॉम्प्रेस लावा. थंड कॉम्प्रेसमुळे शरीराच्या त्या भागाला सुन्नपणाची भावना येईल आणि गरम कॉम्प्रेस तणावग्रस्त स्नायूंना आराम करण्यास मदत करेल.

४. उन्हाळ्यात मायग्रेनचा त्रास अधिक वाढतो. अशा परिस्थितीत शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. जर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास असेल, तर तुमचा मायग्रेनचा त्रासही वाढू शकतो. पाण्याबरोबरच फळांचा रस, नारळपाणी, लिंबूपाणी, लस्सी, ताक व भाज्यांचे रस भरपूर प्या.

५. दररोज मेडिटेशन करा, त्यामुळे मायग्रेनचा त्रास व डोकेदुखी टळते. त्यामुळे मेंदूला आराम मिळतो. कधीकधी जास्त तणावाखाली राहिल्याने देखील मायग्रेनचा त्रास होतो. त्यामुळे मेडिटेशन करा.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT