midnight cravings, Midnight snacks
midnight cravings, Midnight snacks ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

रात्रीच्या वेळी भूक लागत असेल तर, हे पदार्थ खा मिळेल पोषण तत्व

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या आहेत. चुकीच्या जेवणाची वेळ, रात्री उशिरापर्यंत काम करणे अशी आपली दिनचर्या सुरु असते.

हे देखील पहा-

रात्री उशिरा जागल्यानंतर किंवा जेवणाच्या चुकीच्या वेळांमुळे आपल्याला भूक लागते. हळूहळू आपल्याला त्याची सवय होते व आपण रात्रीच्या वेळी वेफर्स, स्नॅक्ससारखे पदार्थ खावू लागतो त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरात निरोगी पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. रात्रीच्या वेळी भूक लागल्यावर कोणते पदार्थ खायला हवे हे जाणून घ्या.

१. रात्रीच्या वेळी केळी (Banana) व दुधाचे (Milk) सेवन आपण करु शकतो. त्यामुळे आपली भूक भागेल.

२. रात्री स्नॅक्स खाण्याऐवजी आपण ज्यूस प्यायला हवे. हर्बल आणि कॅफीन मुक्त कॉफी हा एक चांगला पर्याय आहे.

३. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यास भूक लागत असले तर भरपूर पाणी प्यावे. यामुळे आपली भूक कमी होण्यास मदत होईल.

४. सफरचंद आणि नाशपाती सारखी फळे खा. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आपली भूक शमवण्यासाठी खूप मदत करते.

५. लेट्युस, गाजर याचे सलाद बनवून खाता येईल.

६. पीनट बटर लावून ब्राऊन ब्रेडही खाऊ शकता. तसेच आपण भाज्यांपासून बनवलेले सँडविच देखील खाऊ शकतो. जास्त भूक लागल्यास कमी कॅलरीजची बिस्किटेही खाऊ शकतो.

७. मध्यरात्री भूक लागल्यावर मखण्याचे सेवन करु शकतो. ते अगदी कमी तेलात किंवा बिना तेलाचे आपल्याला खाता येईल आणि भाजलेल्या माखणाच्या सेवनानेही वजन वाढत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Gaming Effects on Kids: ऑनलाइन गेमिंगमुळे मुलांच्या मेंदूवर होतात गंभीर परिणाम; पालकांनी अशी घ्यावी काळजी

Today's Marathi News Live : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर

Sharad Pawar: राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षापासून हिंडतोय; शरद पवारांचं पीएम मोदींना जशास तसं उत्तर

Devendra Fadanvis : त्यांना पक्ष चालविणे कठीण असल्याने विलीनीकरणाचा निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला

Amravati: कोंडेश्वर वीटभट्टीवर महसूलची धडक कारवाई, अतिक्रमित झाेपड्याही जमीनदाेस्त; काेट्यावधींच्या नुकसानीचा वीटभट्टी मालकांचा दावा

SCROLL FOR NEXT