Train News Yandex
लाईफस्टाईल

Train News: ट्रेनमधून या वस्तू घेऊन जात असाल तर सावधान!, शिक्षा होऊ शकते

Lucknow-Rameswaram Train Fire :खासगी डब्यातील सिलेंडरच्या वाहतूकीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या गोष्टी ट्रेनमध्ये नेण्यास बंदी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Do Not Carry These Things In Train : तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला आग लागल्याची घटना घडली. या आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. खासगी डब्यातील सिलेंडरच्या वाहतूकीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या गोष्टी ट्रेनमध्ये नेण्यास बंदी आहे.

तमिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर लागलेल्या आगीमुळे खूप जणांना जीव गमवावे लागले. एका रिपोर्टनुसार, ट्रेनच्या खासगी डब्यातील अनधितकृतपणे केलेल्या सिलेंडरच्या वाहतूकीमुळे हा प्रकार घडला आहे. खासगी डब्यातील प्रवाशांनी चहा बनवण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर करत होते. यामुळे ही घटना घडली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये काही सामान नेण्यावर निर्बंध लादले आहेत.

ट्रेनमध्ये तुम्ही अशा गोष्टी नेऊ शकत नाही, ज्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ट्रेनमध्ये अशा वस्तूंसह पकडल्यास तुम्हाला दंड किंवा तुरंगवास होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला ट्रेनमध्ये कोणत्या गोष्टी नेण्यास मनाई आहे ते सांगणार आहोत.

गॅस सिलेंडर, स्टोव्ह, फटाके, अॅसिड, चामडे, ग्रीस अशा कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील रसायनाची गळती किंवा तुटल्यामुळे प्रवाशांना इजा होऊ शकते. अशा कोणत्याही गोष्टींना ट्रेनमध्ये मनाई आहे. रिपोर्ट्सनुसार, तूप 20 किलोपर्यंत नेले जाऊ शकते. ते टिन बॉक्समध्ये चांगले पॅक केले पाहिजे.

शिक्षा होऊ शकते

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान काही गोष्टी घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. या वस्तूंसह प्रवासी पकडला गेल्यास त्याच्यावर रेल्वे कायदा १६४ अन्वये कारवाई होऊ शकते. यामध्ये दंडासह तीन वर्षांसाठी कारवासाची शिक्षा होऊ शकते.

या गोष्टींची काळजी घ्या

ट्रेनमध्ये प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ट्रेनमध्ये गेटजवळ उभे असताना लोक अनेकदा मोबाईलवर बोलतात, यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना फोनवर बोलणे टाळा. प्रवासादरम्यान लक्षात ठेवा की तुमची बॅग ट्रेनच्या बाहेर लटकलेली नसावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT