Blockages in arteries saam tv
लाईफस्टाईल

Blockages in arteries: शरीरातील रक्तवाहिन्या बंद झाल्यास पायांमध्ये सकाळी दिसतात 'हे' मोठे बदल, कसे कराल उपाय

Blockages in nerves and arteries: चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. यावेळी याचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर देखील होतो. परिणामी नसा ब्लॉक होण्याचा धोका असतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील रक्त धमन्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वं महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचवतं. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे अनेकांना पायांमध्ये विविध समस्या येण्याचा त्रास जाणवतो.

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे पायांमध्येही काही लक्षणं दिसून येतात. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास पाय आणि शरीराच्या खालच्या भागात रक्त प्रवाहास अडथळा येऊ शकतो. जेव्हा पायांच्या धमन्या अडथळ्यामुळे अरुंद होऊ लागतात तेव्हा या समस्येला पेरिफेरल आर्टरी डिसिज (PAD) म्हटलं जातं.

नसा ब्लॉक होण्याची काय आहेत कारणं?

जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील भागावर चरबी आणि कोलेस्ट्रॉल जमा होतं तेव्हा रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. याला पेरिफेरल आर्टरी डिसिज म्हणून पाहिलं जातं. हे बहुतेकदा धुम्रपान, उच्च रक्तदाब पातळी, मधुमेह आणि अनियंत्रित रक्तातील साखरेची पातळी यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य स्थितींमुळे होतं.

शरीरातील नसा ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं

  • चालताना पाय दुखणं

  • पायात क्रॅम्प्स येणं

  • पाय सुन्न होणं

  • थंड पाय

  • बोटांवर जखमा

  • नखांची वाढ नाही

  • नखांवर चमक कमी होणं

रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज रोखण्यासाठीचे उपाय

पायांमधील रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळण्यासाठी, जीवनशैलीत बदल करणं महत्वाचं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. यामध्ये-

  • नियमित व्यायाम करा

  • धूम्रपान टाळा

  • संतुलित आहार घेणे

  • रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित करणे

  • नियमित चाचण्या आणि स्क्रीनिंग करा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT