डेल्टा आणि ओमिक्रॉनमधील फरक ओळखणाऱ्या भारतीय टेस्ट किटला ICMR ची मान्यता Saam TV
लाईफस्टाईल

डेल्टा आणि ओमिक्रॉनमधील फरक ओळखणाऱ्या भारतीय टेस्ट किटला ICMR ची मान्यता

वृत्तसंस्था

प्राची कुलकर्णी, पुणे

पुणे: पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड १९ च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ (CoviDelta) हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे.

या संशोधनाद्वारे कोविड १९ (Covid 19) या संसर्गजन्य रोगाचा नेमका प्रकार ओळखणे सोपे झाले असून अशाच अचूक व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत चाचण्या उपलब्ध करण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगत जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे (GenePath Dx) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, “या चाचणीसंचाच्या मदतीने जगभरात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोविड १९ च्या डेल्टा (Delta Variant)ओमिक्रॉन (Omicron Variant) सोबतच या विषाणूच्या इतर प्रकारांची ओळख पटविणे शक्य झाले आहे. सदर चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेमध्ये विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची (ICMR) मान्यता देखील त्याला मिळाली आहे." (ICMR accreditation of Indian test kits that distinguish between Delta and Omicron)

हे देखील पहा -

जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे संस्थापक आणि चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. निखिल फडके म्हणाले, “या चाचणीसंचाच्या मदतीने पुण्यातील कोविड १९ च्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आम्ही दाखवून देऊ शकलो. इतकेच नव्हे तर पुढे सदर रुग्ण हा ओमिक्रॉन प्रकारानेच बाधित असल्याची पुष्टी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आयसर, बी.जे. मेडिकल कॉलेज व पूना नॉलेज क्लस्टर (पीकेसी) सारख्या भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स (INSACOG) कन्सोर्शीयम अंतर्गत येणा-या संस्थांनी देखील केली. सध्या भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सरकारी आणि खाजगी संस्था या कोविड विषाणूच्या प्रकारांच्या निदानासाठी व त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या चाचणीसंचाच्या वापराचे मूल्यांकन करत आहेत.”

या चाचणीसंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारातील बीए १ व बीए २ सोबत नवीन येत असलेला बीए ३ आणि ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील ठळक फरक ओळखता येतो. सर्व ओमिक्रॉन प्रकारात काही सामाईक उत्परिवर्तन दिसून येते. बीए २ उपप्रकारात स्पाईक जीन डेल ६९-७० उत्परिवर्तन पहायला मिळत नाही. म्हणूनच सर्वत्र करण्यात येणा-या एस- जीन टारगेट फेल्युअर (एसजीटीएफ) चाचणीमध्ये देखील ते समोर येत नाही. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांमध्ये नुकत्याच आढळून आलेल्या रुग्णसंख्येत ७०% रुग्ण हे बीए २ या उपप्रकारातील असून त्यांना एसजीटीएफ चाचणीमध्ये या विषाणू प्रकाराची ओळख पटविण्यास यश आले नाही. मात्र जीनपॅथतर्फे विकसित व आयसीएमआर मान्यताप्राप्त ‘कोविडेल्टा’ या चाचणीसंचात डेल्टा प्रकारात आढळून येणारे मात्र ओमिक्रॉन प्रकारात आढळून न येणारे L452R हे उत्परिवर्तन लक्षात येते. यामुळे सध्या व भविष्यात विषाणू आणि त्याच्या उपप्रकारात होणारे बदल ओळखत डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक समोर आणण्यास ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरेल, असेही डॉ. फडके यांनी सांगितले.

जीनपॅथला नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज् (एनएबीएल) ची मान्यता असून जागतिक दर्जाचे संशोधन याबरोबरच तांत्रिक लॅब हे जीनपॅथचे वैशिष्ट्य आहे. भारतात पुण्याबरोबरच, अमेरिका, युएई येथे देखील संस्था कार्यरत आहे. जीनपॅथच्या माध्यमातून संसर्गजन्य रोग ऑन्कोलॉजी आणि अनुवांशिक विकारांसाठी क्लिनिकल मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक्स, जेनोमिक्स टेस्टिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येतात.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

Jalgaon Religious Places : निसर्गाचं सानिध्य अन् भक्तीचा मेळ, जळगावातल्या धार्मिक स्थळांना भेट द्याच!

Bacchu Kadu: 'राज्याचा सातबारा नावावर आहे का?' बच्चू कडूंचा संजय राऊत, रोहित पवारांवर प्रतिहल्ला; २८८ जागा लढवण्याचीही घोषणा!

SCROLL FOR NEXT