Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : तुमचा पती सुद्धा माहेरच्या व्यक्तींची खिल्ली उडवतो; 'या' टीप्सने डोकं ठिकाण्यावर येईल

Husband Wife Relationship Tips : नवी नवरी म्हणून अनेक मुलींना सासरी बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. काही वेळा पती पत्नीच्या माहेरच्या व्यक्तींवर कमेंट पास करतात. पत्नीला याचा फार जास्त त्रास होतो.

Ruchika Jadhav

लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जावं लागतं. सासरी गेल्यावर तिथे पती व्यतिरिक्त तिच्या जवळचं कोणीच नसतं. अशात नवी नवरी म्हणून अनेक मुलींना सासरी बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. काहीवेळा पती पत्नीच्या माहेरच्या व्यक्तींवर कमेंट पास करतात. पत्नीला याचा फार जास्त त्रास होतो.

मात्र हा त्रास सहन करताना एका पॉइंटला महिलांना फार अपमानास्पद वाटतं. माहेरची माणसं आपल्या फार जवळची असतात. आतापर्यंत जसं जमेल तसं आपल्या आई वडिलांनी आपल्याला वाढवलेलं असतं. त्यामुळे आपल्या माहेरच्या व्यक्तींची पतीने रिस्पेक्ट करावी असं पत्नीला वाटतं. आता पती असं करत नसेल. त्याला सतत प्रेमाणे सांगून देखील तो पालकांची खिल्ली उडवत असेल तर या टिप्सने तुमच्या पतीला चांगलंच वठणीवर आणता येईल.

शांत रहा आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्या

जेव्हा पती सतत असं वागत असेल तेव्हा तुम्ही स्वत: शांत राहिलं पाहिजे. शांत राहून पतीला सांगा त्याला पटवू द्या की मला याचा त्रास होत आहे. पतीचं असं वागणं पाहून सासू-सासरे याचा गैरफायदा घेत आहेत. तसेच ते देखील तिला तिच्या माहेरच्या माणसांवरून हिणवत आहेत, हे पतीला समजावून सांगा.

माहेरच्या गोष्टी शेअर करू नका

जर तुम्ही पतीला तुमच्या माहेरच्या गोष्टी सांगत असाल तर आजच बंद करा. माहेरी काही अडचणी तसेच होणारे वाद तुमच्या पतीला कधीच सांगू नका. कारण माहेरी असं सर्व शेअर केल्याने पती याचा गैरफायदा घेतो आणि आपल्या माहरेच्या व्यक्तींबद्दल वाईट बोलतो.

पतीच्या आई-वडिलांचा मान ठेवा

बऱ्याचदा महिला आपल्या सासू-सासऱ्यांची रिस्पेक्ट करत नाहीत. त्यांची रिस्पेक्ट न केल्याने पती देखील आपल्या आई-वडिलांची रिस्पेक्ट करत नाही. त्यामुळे कायम पतीच्या आई-वडिलांचा सुद्धा मान ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT