Baba Vanga 2025 Predictions saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga: 2025 पासून जगात होणार मानवतेचा अंत; बाबा वेंगांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी!

Surabhi Jagdish

भविष्यवाणी करण्यासाठी बाबा वेंगा यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे. अशी अनेक भाकितं आहे जी बाबा वेंगा यांनी केली होती आणि ती खरी ठरली होती. बाबा वेंगाप्रमाणे असे अनेक व्यक्ती होते ज्यांनी आगामी वर्षाबाबत भाकितं केली आहेत.

मुळात ज्यावेळी नवीन वर्ष सुरू होत असते त्यावेळी नव्या वर्षात घडणाऱ्या अनेक चर्चांना उधाण मिळतं. आता जग 2024 वर्षाच्या अखेरीकडे वाटचाल करतंय. अशा परिस्थितीत 2025 चे अंदाज चर्चेत आले आहेत. बल्गेरियाचे महान पैगंबर बाबा वेंगा यांनी 2025 मधील जागतिक घडामोडींच्या संदर्भात काही भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी नेमकी काय आणि कशी आहे ते जाणून घेऊया.

संपूर्ण जग नष्ट होण्याच्या मार्गावर?

बाबा वेंगा यांनी अनेक दशकांपूर्वी भाकीत केलं होतं की, 2025 पासून जगाचा सर्वनाश सुरू होणार आहे. शिवाय या वर्षापासून हळूहळू मानवतेचाही अंत होऊ शकतो. मानवाचे अस्तित्व पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीसं होण्यासाठी ५०७९ वर्षे लागण्याची शक्यता आहे.

यरोपातून होणार महाविनाशाला सुरुवात?

बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, 2025 मध्ये जगाचा सर्वनाश सुरू होणार आहे. आणि या विनाशाची सुरुवात युरोपमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाने होऊ शकते. त्याचप्रमाणे 2025 मध्ये अशा भयानक घटना घडतील, ज्यामुळे मानवतेचा अंत होण्याची दाट शक्यता आहे.

बाबा वेंगा यांनी सांगितलंय की, हवामानातील बदल, राजकीय बदल यामुळे येत्या काळात पृथ्वीवर राहणं कठीण होणार आहे. यामुळे 2130 मध्ये मानवाचा अलौकिक प्राण्यांशी संपर्क होणार आहे. येत्या काळात माणसांना त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर थेट पृथ्वीच्या बाहेर आश्रय घ्यावा लागणार आहे. यानंतर शेवटी ५०७९ साली पृथ्वीवरून सर्व काही नष्ट होणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अखेर झुकावं लागलं! पाकिस्तान नव्हे, तर या देशात होणार Champions Trophy ची फायनल

Marathi News Live Updates : धनगर समाजातील आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत होणार भेट

Byculla Building Collapse : मुंबईतील भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळला; परिसरात धावाधाव,VIDEO

Navratri 2024: नवरात्रीच्या आठव्या दिवशी करा 'हे' उपाय मिळवा देवीचा आशिर्वाद

IND vs BAN 2nd T20I: दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? हा खेळाडू करु शकतो पदार्पण

SCROLL FOR NEXT