kidney failure symptoms google
लाईफस्टाईल

Kidney Failure : किडनी फेल होण्याआधी डोळे देतात हे संकेत, वेळीच सावध व्हा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Early Kidney Dsease Symptoms : डोळ्यातील बदल हे किडनी आजारांचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. सूज, धूसर दिसणे, लालसरपणा, थकवा ही लक्षणं किडनी निकामी होण्याचा धोका दर्शवतात. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

आपल्या शरीरात असे काही अवयव असे आहेत जे कधीच विश्रांती घेत नाहीत. हे अवयव आपल्याला सहज पाहता येत नाहीत. त्यामध्ये तुमचे हृदय, फुफ्फुसे, मेंदू आणि किडनीचा यांचा समावेश होतो. त्यातील किडनी आपल्या शरीरातली घाण आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम करतं. तसेच रक्त शुद्ध ठेवून मिनरल्सचे प्रमाण योग्य करते. मात्र किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागली तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची सुरुवात बहुतेक वेळा डोळ्यांपासून होते.

डोळे हा शरीराचा अतिशय महत्वाचा आणि नाजूक भाग असतो. त्यामुळे शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ किंवा मिनरल्सचं प्रमाण लगेचच दिसू लागतं. त्यामुळे अनेक वेळा डोळ्यामधील सूक्ष्म बदल हे किडनीच्या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणं ठरतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली सतत दिसणारी सूज ही फक्त थकवा किंवा अपूर्ण झोपेमुळे नसते. तर किडनीतून प्रथिनं बाहेर पडत असल्याचे संकेत असू शकतात. त्याचप्रमाणे अचानक दृष्टी धूसर होणे, दुहेरी दिसणे, डोळे सतत लाल होणे किंवा कोरडेपणा येणे हेही गंभीर इशारे असू शकतात.

काही वेळा डोळ्यांच्या रेटिनावर परिणाम होऊन निळा, पिवळा रंग ओळखण्यात अडचण येऊ शकते. तर सततचा थकवा, कमी झोप आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणं हेही किडनीच्या आजाराशी संबंधित असतं.

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, जर डोळ्यात असे बदल सतत जाणवत असतील तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आरोग्याचं रक्षण करणे ही खरी जीवनशैली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT