How to clean baby tongue, child care, Parenting tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

नवजात बाळाच्या तोंडाच्या आतील भागांची काळजी कशी घ्याल?

बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याची अधिक काळजी घेत असतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याची अधिक काळजी घेत असतो. बाळाची काळजी घेण्यापूर्वी त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.

हे देखील पहा -

आपण बाळाच्या बाहेरील अवयंवाची पुरेपुर काळजी घेतो परंतु, त्याच्या आतील अवयंवाची काळजी घेणे खरेतर कठीण असते. बाळ लहान असल्यामुळे ते आईचे दुध पित असते. त्यामुळे त्याच्या तोंडाच्या आतील भागाची स्वच्छता करता येत नाही. आतील भागाची स्वच्छता न केल्यामुळे दाताचे व इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आपण बाळाच्या जीभेची नियमितपणे स्वच्छता करायला हवी. कारण बाळाला मिळणारे पदार्थ हे त्याच्या लाळेतून पोटात जातात. त्यासाठी त्याच्या तोंडातल्या आतील भागांची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, त्यांच्या जीभेची साफसफाई करणे इतके सोपे देखील नाही. त्याच्या जीभेला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते रडू लागतात. त्याची स्वच्छता कशी राखायला हवी जाणून घेऊया.

१. बाळाच्या जीभेची स्वच्छता करण्यासाठी आपले हात स्वच्छ धुवा व त्यानंतर स्वच्छ सूती कापडाला कोमट पाण्यात भिजवा. कापड बोटाला गुंडाळून बाळाची जीभ स्वच्छ करा.

२. बाळाचे तोंड हळू हळू उघडून जीभ स्वच्छ करण्यासाठी आपले बोट तोंडाच्या आत घाला. एकदा बोट तोंडात घातल्यावर बोटाला हळूवारपणे गोलाकार हालचालीत जिभेवर फिरवून घ्या. त्यामुळे बाळाच्या तोंडाच्या आतील चिकटपणा निघून जाण्यास मदत होईल.

३. तसेच तोंडाच्या आतील हिरड्या देखील स्वच्छ करा त्यामुळे दात येताना अधिक त्रास होणार नाही. बाळाला (Child) दात येत असतील तर कापडाच्या सहाय्याने आरामात स्वच्छ करा.

४. बाळाच्या तोंडात साचलेलील घाण साफ करण्यासाठी आपण गम क्लिनरचा देखील वापर करु शकतो. याच्या अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

५. बाळाचे तोंड स्वच्छ (Clean) करताना त्याच्या जिभेवर पांढरा थर जमा झाला आहे का ते तपासा. हे इन्फेक्शन असू शकते त्यासाठी डॉक्टरांना त्वरीत भेटा.

६. बाळाला दूध पाजल्यानंतर, तोंड पूर्णपणे स्वच्छ करा आणि दिवसातून एकदा त्याची जीभ स्वच्छ करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fake School Scam: राज्यात बोगस शाळा घोटाळा उघडकीस; 'साम'च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश

Rashmika Mandanna Birthday : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना कितवी शिकलीय?

Baramati Bypoll: सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून मविआत मतभेद? बारामतीसाठी काँग्रेसनं ठोकला शड्डू

Maharashtra Live News Update : मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

SCROLL FOR NEXT