Hair Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Loss : सततच्या गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश, केस होतील दाट आणि शायनी

How To Stop Hair Loss : केसांच्या या समस्यांमुळे केस पातळ आणि खूप कोरडे होतात. ज्यामुळे तुमचा लूकही खराब होतो. याशिवाय केस गळण्याच्या समस्येमुळे आपल्याला सतत ताण देखील येतो. केसांचे आरोग्य राखणे अधिक गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

How To Prevent Hair Falls Problem :

सौंदर्य वाढवण्यासाठी चेहराच्याचे नाही तर केसांचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसांचे अधिक नुकसान होते. यामुळे केसात सतत कोंडा, केस गळणे, स्प्लिट एंड्स सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

केसांच्या या समस्यांमुळे केस (Hair) पातळ आणि खूप कोरडे होतात. ज्यामुळे तुमचा लूकही खराब होतो. याशिवाय केस गळण्याच्या समस्येमुळे आपल्याला सतत ताण देखील येतो. केसांचे आरोग्य राखणे अधिक गरजेचे आहे. केसांना निरोगी राखण्यासाठी आहारात काही बदल करायला हवे. ज्यामुळे केसांचे आरोग्य (Health) सुधारण्यास मदत होईल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. अंडी

केसांना निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेकदा केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अंड्यांमध्ये प्रथिने आढळतात. ज्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. प्रोटिनसोबत बायोटिन देखील त्यात आढळते. जे केसांना केराटिन प्रोटीन बनवण्यास मदत करते.

2. बदाम

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन (Vitamin) ई खूप महत्त्वाचे आहे. स्कॅल्प निरोगी ठेवण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. याव्यतिरिक्त त्यात जस्त असतात, जे केसांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे निरोगी केसांसाठी बदाम खाणे खूप फायदेशीर ठरु शकते.

3. रताळे

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन आढळते. ज्याचे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रुपांतरित करते. टाळूमध्ये असलेल्या ग्रंथींमधून सेबम तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज दिसत नाही. याशिवाय केसांच्या वाढीसाठीही हे खूप महत्त्वाचे आहे.

4. पालक

पालकमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए आणि फोलेट्स आढळतात. हे सर्व पोषक घटक केसांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. यामुळे केस तुटण्याची समस्या कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT