अ‍ॅसिडिटी
अ‍ॅसिडिटी Saam Tv
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढला आहे? हे पदार्थ देतील आराम!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात (Summer Season) वातावरणातील तापमान वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत आपल्या शरीरात मसालेदार आणि स्निग्ध पदार्थ नीट पचत नाहीत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) बिघडते, परिणामी शरीरावर बॅक्टेरिया आणि विषाणूंचा हल्ला होतो. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटात संसर्ग, पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचन क्रियेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. बहुतेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण भरपूर पाणी प्यावे कारण पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जाते. याशिवाय अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, जे पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासोबतच शरीराला थंडावा देतात.

या पदार्थांमुळे पचनाशी संबंधित समस्या नियंत्रित होतील;

ताक;

उन्हाळ्यात ताक हे थंडाव्यासाठी उत्तम पेय आहे. ताक प्यायल्याने पोटात थंडावा कायम राहतो. यामध्ये असेलले बॅक्टरीया पोटात अधिक प्रमाणात ऍसिड बनणान्यापासून रोखते. तसेच हे अ‍ॅसिडिटी व्यतिरिक्त पोटाच्या अन्य समस्या देखील दूर करते. उन्हाळयाच्या दिवसात जेवण केल्यानंतर रोज ताक आवर्जून प्यायले पाहिजे.

नारळ पाणी;

नारळ पाण्यात भरपूर न्यूट्रिशन्स असतात. तसेच हे प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते आणि थंडावा मिळतो. यामध्ये शरीरात डिटॉक्स करण्याचे गुण असतात. हे अ‍ॅसिडिटी दूर करते. सोबतच यात फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते.

केळी;

उन्हाळ्यात पिकलेल्या केळीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. पिकलेल्या केळीमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे गुणधर्म आहेत. पोटॅशियममुळे ते अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवत असते. फायबरमध्ये भरपूर असल्याने ते पचनाशी संबंधित इतर समस्या दूर करते.

थंड दूध;

जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही थंड दुधाचे सेवन करा. उन्हाळ्यात थंड दूध प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि जळजळ, अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या होत नाहीत. परंतु लक्षात असुद्या की फ्रीजमध्ये ठेवलेले दूध पिण्याऐवजी साधे थंड दूध पिणे चांगले.

खरबूज;

अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर अॅसिड रिफ्लक्सने समृद्ध असल्यामुळे खरबूज पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील अनेक आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. तसेच पाण्याची कमतरता दूर होते. गॅस आणि अ‍ॅसिडिटी सारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे गुणकारी मानले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Curd: विरजण नसतानाही घरच्याघरी दही लावायचं? मग जाणून घ्या 'या' सोपी पद्धत

IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

Today's Marathi News Live: PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

SCROLL FOR NEXT