How to reuse old bedsheet, home tips, fashion tips
How to reuse old bedsheet, home tips, fashion tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जुन्या व वापरलेल्या बेडशीटचा पुनर्वापर कसा कराल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सततच्या वापरामुळे आपल्या घरातील बऱ्याच वस्तू जुन्या आणि खराब होतात. त्यातल्या काही वस्तू आपण फेकून देतो किंवा त्यांचा आपण पुनर्वापर करतो. आपल्या घरातल्या जुन्या व बेडशीटचा वापर कसा करता येईल.

हे देखील पहा-

अनेकदा घरातील बेडशीट जुनी झाल्यानंतर कपाटात वर्षानुवर्षे पडून राहते. कुठेतरी फाटलेली किंवा डाग असल्यामुळे आपण त्या बेडशीटचा वापर करणे शक्यतो टाळतो परंतु, अशावेळी या सुंदर आणि वापरलेल्या बेडशीटचा आपण कशाप्रकारे पुनर्वापर करु शकतो हे पाहूया.

१. आपण या वापरलेल्या बेडशीटपासून हँगिंग बनवू शकतो, ज्यामध्ये आपल्याला त्याचे फॅब्रिक वापरता येईल. यामुळे आपल्या घराच्या (Home) सौंदर्यात भर पडेल व बेडशीचा पुनर्वापरही होईल. यासाठी आपल्याला प्लॅस्टिक किंवा मेटलच्या गोल फ्रेमला मणी लावू शकतो आणि बेडशीटचे फॅब्रिक आपण हव्या त्या आकारात कापून त्याचे हँगिंग बनवू शकतो.

२. बेडशीट खूप खराब झाली नसेल, तर आपण त्याचा पायजमा देखील शिवू शकतो. बेडशीटपासून बनवलेला पायजमा आपण सहजपणे घालू शकतो यामुळे बेडशीट उपयोग होईल.

३. बेडशीट मधूनच फाटली असेल तर आपण त्यापासून घरासाठी सुंदर पडदे देखील बनवू शकतो. बाजारात (Market) अनेकदा पडदे महाग मिळतात किंवा आपल्याला हवे तसे मिळत नाही अशावेळी आपण बेडशीटचा वापर करु शकतो.

४. आपण बेडशीटपासून रंगीबेरंगी हेअरबँड्सही बनवू शकतो. त्यासाठी आपल्या हेअरबँडच्या आकाराचे फॅब्रिक वापरावे लागेल.

५. आपल्या घरातील सिल्क आणि मलमलच्या कपड्यांसारख्या अनेक महागड्या कपड्यांवर मेटल हँगर्सचे डाग पडतात त्यामुळे कपडे खराब होतात. आपले कपडे खराब होऊ नये यासाठी आपण जुन्या बेडशीटच्या फॅब्रिकने मेटल हँगर्सला कव्हर बनवू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT