How To Remove White Hair Naturally
How To Remove White Hair Naturally Saam Tv
लाईफस्टाईल

How To Remove White Hair Naturally : तुमचे केस देखील अकाली पिकताय? त्यांना नैसर्गिकरित्या काळे कसे कराल ? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

How To Remove White Hair Naturally : पूर्वी केस पांढरे झाल्यानंतर आपले वय झाले व आपण म्हातारे झालो असे प्रत्येकाला वाटू लागते परंतु, हल्ली या केसांचे पिकणे १४ ते १५ वर्षांचा मुलांमध्ये दिसून येत आहे.

याची कारणे अनेक आहेत. परंतु, आपल्यापैकी बरेच लोक केसांची काळजी घेण्यासाठी विविध महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण तरीही विशेष परिणाम दिसून येत नाही.

शरीरामध्ये प्रथिने, लोह व जीवनसत्त्वांची कमतरता झाल्यास केस पांढरे होऊ लागतात. तणाव किंवा जंक फूड खाल्ल्याने हा केस पिकू शकतात. अधिक ताण घेतल्याने केस पिकू लागतात ते काळे करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु अशावेळी घरगुती उपाय प्रभावी ठरतात. त्यासाठी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.

पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय

साहित्य

आवळा पावडर - १ मोठा चमचा

ब्लॅक टी - २ मोठे चमचे

कॉफी - १ मोठा चमचा

काथ - १/२ इंच

अक्रोडची साल - १ तुकडा

इंडिगो पावडर - १ चमचा

ब्राह्मी पावडर - १ मोठा चमचा

त्रिफळा पावडर - १ चमचा

पाणी (Water) - २ लीटर

कृती -

सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात २ लिटर पाणी घ्यावे व गॅसवर गरम करायला ठेवा. नंतर त्यात आवळा पावडर, ब्लॅक टी, कॉफी पावडर, काथ तुकडा, अक्रोडाची साल, इंडिगो पावडर, ब्राह्मी पावडर आणि त्रिफळा पावडर घाला. सर्व गोष्टी नीट मिसळा. आता गॅस मंद आचेवर ठेवून सुमारे ३० मिनिटे शिजू द्या. चांगले शिजल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. आता चाळणीच्या साहाय्याने गाळून हवाबंद डब्यात ठेवा.

तयार मिश्रण लावण्याची योग्य पध्दत -

ही पेस्ट केसांना (Hair) चांगल्या पध्दतीने लावा. तसेच लावताना मुळावर लावयला विसरू नका. सुमारे ३० मिनिटे केसांवर राहू द्या. नंतर शैम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट केसांना लावल्यास फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

SCROLL FOR NEXT