How to remove Turmeric Stains in marathi, cleaning tips and tricks
How to remove Turmeric Stains in marathi, cleaning tips and tricks ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

हळदी तुझा रंग गहिरा का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वयंपाक घरात, जेवणाच्या डब्यात किंवा लग्नसराईत हळदीचा सुवास सगळीकडे दरवळताना आपण पाहतो. आयुर्वेदामध्ये हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खाद्यपदार्थापासून ते धार्मिक कार्यात हळदीला विशेष स्थान आहे. हळदीत अनेक औषधी गुणधर्म आहे परंतु, जितकी हळदी चांगली तितकेच वाईट तिचे डागही.

हे देखील पहा -

खाताना किंवा स्वयंपाक (Kitchen) करताना कपड्यांवर अनेकदा हळदीचे डाग कपड्यांना लागतात. हलक्या रंगाच्या कपड्यांना हट्टी डागांपासून मुक्त करणे इतके सोपे नाही, म्हणूनच बऱ्याचदा गडद रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते. हळदीचा रंग गडद असतो आणि जर तो कपड्यांवर लागला तर तो एक हट्टी डाग बनतो. पांढरा कुर्ता, शर्ट किंवा पँटवर हळद लागल्यास काळजी करण्याची गरज नाही, सोप्या घरगुती उपायांनी आपण या डागांपासून मुक्ती मिळवू शकतो.

हळदीचे डाग कसे घालवाल?

१. अनेकवेळा आपण घराबाहेरचे अन्नपदार्थ खातो आणि पांढऱ्या कपड्यांवर भाजी किंवा हळदीचा डाग लागला तर तो काढणे कठीण होते. अशावेळी आपण डाग लागलेल्या ठिकाणी लिंबू चोळू शकतो किंवा त्याचे काही थेंब डागांवर लावू शकतो व नंतर ते पाण्याने (Water) स्वच्छ करा.

२. पांढऱ्या किंवा हलक्या कपड्यावर हळदीचे डाग लागल्यास सर्वात आधी थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळाने धुवा. थंड पाण्यामुळे गडद रंग हलका होण्यास मदत होईल परंतु, बरेच लोक गरम पाण्याचा डागांवर वापर करतात पण त्याने डाग पसरण्याची शक्यता अधिक असते.

३. टूथपेस्टचा वापर हट्टी डाग दूर करण्यासाठी केला जातो. डाग असलेल्या भागावर टूथपेस्ट लावून घासून तो भाग कोरडा होऊ द्या नंतर, स्वच्छ पाण्याने धुवा.

४. व्हाईट व्हिनेगरचा वापर जितका जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो तितकाच कपड्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठीही केला जातो. लिक्विड साबणामध्ये व्हिनेगर मिसळून डाग असलेल्या ठिकाणी लावा. कोरडे झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ (Clean) करा.

अशाप्रकारे हळदीचे हट्टी डाग आपण काढू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT