White Clothes Cleaning Hacks
White Clothes Cleaning Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

White Clothes Cleaning Hacks : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग जात नाही ? मग या सोप्या टिप्स फॉलो करा, मिनिटात होतील नव्यासारखे

कोमल दामुद्रे

Cleaning Hacks : पांढरे कपडे घातल्यानंतर भीती वाटते ती, त्याला डाग लागण्याची. डाग लागल्यानंतर आपल्या टेन्शन येते की, आता हा हट्टी डाग काढायचा कसा. बरेचदा डाग निघाला नाहीतर आपल्याला आपल्या आवडत्या कपड्यांना टाकून द्यावे लागतात.

रंगीत टीशर्ट किंवा पँटवर डाग (Stain) लागल्यास ते दिसत नाही परंतु, जेव्हा पांढऱ्या कपड्यावर डाग पडतात तेव्हा ते कापड कोपऱ्यात ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नसतो. आज आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स (Tips) शेअर करणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी पांढर्‍या कपड्यांवरील हट्टी डागही सहज काढू शकता. चला तर मग जाणून घेऊया या हॅक्सबद्दल(Hacks).

1. हायड्रोजन पेरोक्साइड

कोणत्याही फॅब्रिकवरील हट्टी डाग काढण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर आपण करु शकतो. पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी याचा वापर सहज काढता येतो. यासाठी आपण गरम पाण्यात १ ते २ चमचे हायड्रोजन पेरोक्साइड मिक्स करा. त्यानंतर डाग लागेला भाग त्यात बुडवा व काही काळ तसाच ठेवा. काही वेळाने ब्रशच्या मदतीने तो भाग चांगल्या पद्धतीने घासून स्वच्छ करा. यामुळे डाग निघून जाण्यास मदत होईल.

2. अल्कोहोल

अल्कोहोलचा वापर करुन आपण काही मिनिटांत पांढऱ्या रंगाचे कपडे सहज साफ करु शकतो. याच्या वापराने कपड्यांचे डाग तर निघतात त्याचबरोबर त्याची चमकही टिकून राहाते. यासाठी अल्कोहोलसोबत लिंबाचा रस चोळा. त्यानंतर डाग लागलेल्या भागांवर १० मिनिटे पसरवा व नंतर ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डाग निघून जाईल.

3. बेकिंग सोडा

स्वयंपाकघरात वापरला जाणारा बेकिंग सोड्याचा वापर आपण कपड्यांवरील हट्टी डागांसाठी करु शकतो. पांढऱ्या कपड्यांवर टोमॅटोचे, हळद किंवा तेलाचे डाग लागले असतील तर बेकिंग सोड्याचा वापर करु शकतो. डाग लागलेल्या भागांवर १० मिनिटे पसरवा व नंतर ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डाग निघून जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde News Today: मराठा आंदोलक तरुणांची पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी!

Team India Squad: टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट! अशी असेल प्लेइंग ११

Arvind Kejriwal : माझी चिंता करू नका, लवकरच...; अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून कोणता मेसेज दिला?

Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Amol Kirtikar News | अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंकडून घेतला ABफॉर्म

SCROLL FOR NEXT