पावसाळा संपला तरी घराच्या छतावर, गच्चीवर, अंगणात आणि भिंतींवर शेवाळ साचलेलं दिसतं. सततचा पाऊस, ओलावा आणि पाणी साचून राहिल्यामुळे या ठिकाणी हिरव्या रंगाचा थर तयार होतो. सुरुवातीला हे शेवाळ फारसं लक्षात येत नाही. मात्र, हळूहळू त्याचं प्रमाण वाढतं आणि घराच्या स्वच्छतेसोबतच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. कारण शेवाळ साचलेल्या जमिनीवरून चालताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच दुखापत होण्याचा धोका असतो.
अनेकजण शेवाळ काढण्यासाठी बाजारातून महागडे क्लीनर आणतात. पण तरीही काही दिवसांनी शेवाळ पुन्हा जमा होतं. अशावेळी काही सोप्या गोष्टींचा वापर करून घराच्या छतावरील आणि भिंतींवरील शेवाळ स्वच्छ करता येऊ शकतं. चला तर जाणून घेऊया शेवाळ काढण्याचे काही सोपे उपाय.
सर्वप्रथम छतावर ज्या ठिकाणी शेवाळ जमा झालं आहे, ती जागा ओळखा. त्यानंतर शेवाळ असलेल्या भागावर थोडा चुना टाका. आता ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने हा भाग हलक्या हाताने घासून घ्या. गरजेनुसार थोडं पाणी वापरू शकता. यामुळे शेवाळाचा थर सैल होण्यास मदत होते आणि तो स्वच्छ करणं सोपं जातं. मात्र, शेवाळ काढताना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
चुन्यामुळे शेवाळाची जमिनीवरची पकड कमी होते. त्यामुळे ब्रशने घासल्यानंतर शेवाळ सहज निघू शकतं. यासाठी महागड्या क्लीनरवर पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. मात्र, चुना वापरताना हातमोजे आणि डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे वापरा. तसेच आधी छोट्या भागावर चाचणी करा. केवळ छतच नाही, तर घराच्या बाहेरील भिंतींवरही पावसामुळे शेवाळ जमा होतं. अशा वेळी योग्य पद्धतीने स्वच्छता केल्यास भिंतींवरील हिरवा थर काढण्यास मदत होऊ शकते. भिंतीच्या रंगाला किंवा पृष्ठभागाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
आपण राहत असलेल्या घराच्या छतावर आणि अंगणात पाणी साचू देऊ नका. तसेच पाणी साचल्यास आठवड्यातून एकदा छताची स्वच्छता करा. त्याने छत आणि आंगण स्वच्छ राहील. परंतु पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का हे वारंवार तपासा.कारण जास्त ओलावा असलेल्या जागेत शेवाळ लवकर येतं. त्यामुळे जमीन शक्यतो कोरड्या ठेवा. तसेच भिंतींमधून पाणी झिरपत असल्यास वेळीच त्याची दुरुस्ती करून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.