जेवण बनवल्यावर सर्वात मोठं काम असतं ते भांडी घासण्याचं. आपण स्टिल आणि प्लास्टीकची भांडी जेवणासाठी वापरतो. काही व्यक्ती प्लास्टिकचे डब्बे सुद्धा जेवणासाठी वापरतात. प्लास्टिकच्या डब्ब्यातील पदार्थ संपल्यावर आपण ते साबणाने स्वच्छ घासून धुवून ठेवतो. मात्र अनेकदा प्लास्टिकचे डब्बे कितीही घासले तरी तेलकट राहतात. त्यामुळे महिला सतत परत परत हे डब्बे क्लिन करतात मात्र याचा वास आणि तेलकटपणा जात नाही. त्यामुळे अशा समस्येवर काय उपाय करावा याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
क्लिनिंग प्रोसेसमध्ये तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोड्याचा वापर केल्याने प्लास्टिकच्या भांड्याला असलेला पदार्थांचा वास आणि अतिरिक्त तेल कमी होतं. काहीवेळा असे डब्बे घासून ठेवल्यावर सुद्धा चिकट होतात. त्यामुळे एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. त्यात प्लास्टिकचे भांडे ३० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर साध्या पाण्यात भांडे स्वच्छ धुवून घ्या. लगेचच प्लास्टिकचा डब्बा स्वच्छ होईल.
बेकिंग सोडासह लिंबाचा रस आणि मीठ सुद्धा प्लास्टिकचा डब्बा स्वच्छ करण्यासाठी बरंच फायद्याचं ठरतं. प्लास्टिकच्या भांड्याला असलेले तेलाचे डाग आणि वास यांपसून सुटका मिळवण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र मिक्स करून घ्या. तसेच हे मिश्रण कोमट पाण्यात ठेवा. त्यामध्ये प्लास्टिकचे डब्बे टाकून ठेवा. फक्त ५ मिनिटे प्लास्टिकचे डब्बे या पाण्यात भिजू द्या. या ट्रिकनेही तुमच्या समस्या सॉल्व्ह होईल.
लिंबू व्यतिरिक्त तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात व्हिनेगर घ्या. त्यामध्ये गरम किंवा कोमट पाणी ओतून ठेवा. पाणी जास्त गरम नसावे याची काळजी घ्या. जर तुमच्याकडे प्लास्टीकचा डब्बा असेल तर या डब्ब्यात असं पाणी भरून ठेवा. त्यानंतर डब्बा साबण आणि पाणी टाकून धुवून घ्या.
झटपट ताजेतवाणे वाटावे यासाठी अनेक व्यक्ती कॉफी पितात. हिच कॉफी पावडर तुमचं प्लास्टिकचं भांडं सुद्धा स्वच्छ करू शकते. तुमचा प्लास्टिकचा डब्बा किंवा एखादं भांडं जास्त चिकट आणि तेलकट वाटत असेल. तसेच त्याचा वास येत असेल तर असे डब्बे पाण्याने ओले करून घ्या. त्यानंतर त्यांवर कॉफी पावडर टाकून ठेवा. ५ मिनिटांनी हे भांडे त्यावर असलेल्या कॉफीनेच घासून घ्या.
या काही सिंपल टिप्सच्या मदतीने तुमच्या प्लास्टिकच्या डब्ब्याला येणारा वास मिनिटांत निघून जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.