Cancer Prevention Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Cancer Prevention Tips : या सवयी आजपासून बदलाच, कर्करोगापासून राहाल दूर

Cancer prevention : कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. भारतात महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. या आजारामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. कर्करोगाच्या पेशी शरीरात कुठेही तयार होऊ शकतात.

कोमल दामुद्रे

Tips To Reduce Your Risk :

कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. भारतात महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. या आजारामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. कर्करोगाच्या पेशी शरीरात कुठेही तयार होऊ शकतात.

कर्करोगामध्ये (Cancer) काही वेळेस हा आजार हळूहळू पसरतो तर काही वेळेस वेगाने. अति गंभीर असणारा कर्करोगावर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही परंतु, काही वेळेस सवयी बदल्या तर या आजाराचा (Disease) धोका कमी करता येतो. या आजारावर कशी मात करायची जाणून घेऊया

1. आहार

योग्य आहार (Food) घेतल्यास तुम्ही निरोगी राहू शकता. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. आपल्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. यामध्ये अधिक प्रमाणात पोषक, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असते. ज्यामुळे शरीराला कर्करोगाच्या पेशींपासून संरक्षण मिळते.

2. व्यायाम

शारीरिक हालचाली केल्याने केवळ वजन नियंत्रित ठेवता येते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो. आठवड्यातून किमान चार ते पाच वेळा व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्याने शरीरातील संप्रेरक पातळी नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

3. सूर्यप्रकाश

त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. यासाठी उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सनग्लासेस घाला आणि उष्ण हवामानात उन्हात बाहेर पडणे टाळा. चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. तसेच फुल हाताचे कपडे घाला. यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

4. मद्यपान

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने स्तन, यकृत आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो. यासाठी अल्कोहोलचे सेवन कमी करा. अन्यथा, आरोग्यावर परिणाम होईल.

5. धुम्रपान

तंबाखूचे सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. फुफ्फुसे आणि तोंडाचा कर्करोग यांसारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगासाठी जबाबदार आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी धुम्रपान सोडणे गरजेचे आहे. धूम्रपान सोडल्याने केवळ कर्करोगच नाही तर इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT