Jwari Upma Recipe Jowar Recipe - Saam Tv
लाईफस्टाईल

Jowar Upma Recipe : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल ज्वारीचा उपमा, पचनही सुधारेल; थंडीच्या दिवसात चव चाखाच

Healthy Breakfast Recipe : तुम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल आणि आहारात चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करायचा असेल तर ज्वारीचा उपमा ट्राय करु शकता.

कोमल दामुद्रे

How To Make Healthy Jwari Upma:

हिवाळ्यात वाढत्या वजनाला सहज कमी करता येतं नाही. व्यायाम करु देखील वाढते वजन नियंत्रणात येतं नाही. थंडीच्या काळात आपल्या हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. या काळात अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.

जर तुम्हालाही तुमच्या आरोग्याची (Health) काळजी घ्यायची असेल आणि आहारात चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करायचा असेल तर ज्वारीचा उपमा ट्राय करु शकता. हा उपमा बनवायला अगदी सोपा आहे. यामुळे सतत भूक लागत नाही तसेच वजनही नियंत्रणात राहाते. रेसिपी (Recipes) कशी बनवायची पाहूया.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • ज्वारीचे पीठ - १ कप

  • बारीक चिरलेला कांदा- १/२ कप

  • रवा - १/२ कप

  • उकडलेले हिरवे वाटाणे - १/२ कप

  • हिरव्या मिरचीची पेस्ट - २ चमचे

  • चिरलेला कोथिंबीर - २ चमचे

  • हिंग - १ चिमूट

  • मोहरी - १ चमचा

  • उडदाची डाळ - १ चमचा

  • कढीपत्ता

  • लिंबू

  • तेल (Oil) - १ ते २ चमचे

  • मीठ

2. कृती

  • ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी कांदा आणि कढीपत्ता बारीक चिरुन घ्या. यानंतर वाटाणे उकळवून घ्या.

  • कढईत तेल गरम करुन घ्या. तेलात मोहरी आणि उडदाची डाळ काही सेकंद परतून घ्या.

  • मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला. चमच्याने ढवळत राहा.

  • यानंतर पॅनमध्ये कांदा घालून १ मिनिट भाजून घ्या. त्यानंतर रवा घालून चमच्याने मिक्स करुन मध्यम आचेवर तळून घ्या.

  • यानंतर ज्वारीचे पीठ घालून २ मिनिटे परतवून घ्या. यानंतर हिरवी मिरची पेस्ट, वाटाणे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन शिजवून घ्या.

  • पॅनमध्ये ३ कप पानी घाला आणि ढवळत राहा. उपमा मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे शिजू द्या. लिंबाचा रस घालून गॅस बंद करा.

  • गरमा गरम सर्व्ह करा पौष्टिक ज्वारीचा उपमा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT