Corn Paratha Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Corn Paratha Recipe : मुलांना टिफिनमध्ये द्या कॉर्न पराठा, पौष्टिक आणि चविष्ट देखील; पाहा रेसिपी

How To Make Sweet Corn Paratha : मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला कॉर्नपासून बनवलेले हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ द्यायचे असतील तर तुम्ही कॉर्न पराठ्याची चव चाखू शकता.

कोमल दामुद्रे

Tiffin Box Recipe :

हिवाळ्यात बाजारामध्ये मका आपल्याला हमखास पाहायला मिळतो. परंतु, बरेचदा खाताना मका आपल्या दातात अडकतो त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेक लोक खाताना नाक मुरडतात.

परंतु, मक्यामध्ये असे अनेक घटक असतात ज्याचा आपल्या शरीरावर चांगल्याप्रकारे फायदा होतो. मुलांच्या (Kids) टिफिनमध्ये तुम्हाला कॉर्नपासून बनवलेले हेल्दी (Healthy) आणि पौष्टिक पदार्थ द्यायचे असतील तर तुम्ही कॉर्न पराठ्याची चव चाखू शकता किंवा नाश्त्यामध्ये हा पदार्थ नक्की ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • कणीस - २ ते ३

  • आले-लसूण पेस्ट - १ चमचा

  • हिरव्या मिरचीची पेस्ट - १ चमचा

  • कोथिंबीर - २ चमचे

  • कांदे - २ मध्यम आकाराचे

  • ज्वारीचे पीठ - वाटीभर

  • हळद - चिमूटभर

  • मीठ - चवीनुसार

  • तिखट - १चमचा

  • गरम मसाला - १ चमचा

2. कृती

  • सर्वप्रथम भांड्यात स्वीटकॉर्न आणि कांदा किसून घ्या.

  • नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घाला. तयार मिश्रण अर्धातास झाकूण ठेवा.

  • मिश्रणाला पाणी सुटलं असेल तर त्यात हवी तितकी कणिक घाला. कणिक कोरडी वाटू लागली की, त्यात पाण्याऐवजी दही किंवा ताक घाला.

  • यानंतर त्यात तिखट, मीठ, मसाला, मिरची, कोथिंबीर आणि हळद घालून पीठ चांगले मिळून घ्या.

  • त्यानंतर पीठाचा गोळा घेऊन पराठा लाटून घ्या. तूप लावून तव्यावर खमंग भाजून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT