Homemade Masala Chai Recipe in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Masala Chai Recipe : घरच्या घरी बनवा परफेक्ट मसाला चहा, हिवाळ्यात राहाल अधिक तंदुरुस्त; रेसिपी एकादा पाहाच

Winter Care Masala Tea Recipe in Marathi: सर्दी-खोकल्यासारख्या काही सामान्य आजार झाले तर सगळ्यात आधी आधार घेतला जातो तो मसाला चहाचा. टपरीवर मिळणारा मसाला चहाची बात काही वेगळीच. या चहात घातल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे तरतरी येते, मूड फ्रेश होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षणही होते.

कोमल दामुद्रे

How To Make Perfect Masala Chai :

चहा म्हटलं की, अनेकांचा जीव की प्राणचं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना चहा पिण्याची भारीच हौस असते. अगदी कोणत्याही व्यक्तीला विचारलं की, तुमचं पहिलं प्रेम कोणतं तर तो हमखास सांगेल चहा.

हिवाळ्यात वातावरणात अधिक बदल होत असल्यामुळे आपल्याला काही संसर्गजन्य आजारांना समोरे जावे लागते. सर्दी-खोकल्यासारख्या काही सामान्य आजार झाले तर सगळ्यात आधी आधार घेतला जातो तो मसाला चहाचा. टपरीवर मिळणारा मसाला चहाची बात काही वेगळीच. या चहात घातल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे तरतरी येते, मूड फ्रेश होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षणही होते.

पण हा मसाला चहा घरच्या घरी एकदम परफेक्ट कसा बनवायचा. त्याचे प्रमाण किती असायला हवे. जर तुम्हालाही घरच्या घरी मसाला चहा बनवायचा असेल तर जाणून घ्या रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • वेलची - ४

  • लवंग - ४

  • सुंठ - १ चमचा

  • दालचिनी - २ ते ३ काड्या

  • काळीमिरी - अर्धा चमचा

  • मोठी काळी वेलची - २ ते ३

  • ज्येष्ठमध पावडर - अर्धा चमचा

  • तुळशीच्या पानांची पावडर - अर्धा चमचा

  • बडीशेप - १ चमचा

  • खडी साखर (Sugar) - २ टेबलस्पून

2. कृती

  • सर्वप्रथम मंद आचेवर पॅन गरम करत ठेवा.

  • पॅन हलका गरम झाल्यानंतर त्यात वेलची, लवंग, सुंठ, दालचिनी, काळीमिरी, काळी वेलची सर्व पदार्थ एकत्रित करा.

  • सर्व पदार्थ किमान ४ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्या.

  • भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड होण्यासाठी ठेवा. हे सर्व जिन्नस गार झाल्यानंतर मिक्समध्ये पावडर तयार करुन घ्या.

  • यामध्ये ज्येष्ठमधाची पावडर, तुळशीच्या पानांची पावडर, बडीशेप आणि खडीसाखर घालावी.

  • हवा तेवढा मसाला घालून बनवा फक्कड मसाला चहा. हिवाळ्यात अनेक आजारांवर (Disease) करता येईल मात, तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT