Jwarichi Idli Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Jwarichi Idli Recipe : ना तांदूळ, ना रवा, हेल्दी आणि पौष्टिक पद्धतीने बनवा ज्वारीची इडली; एकदम सॉफ्ट बनेल, पाहा Video

कोमल दामुद्रे

How To Make Jwarichi Idli :

बरेचदा आपल्याला डॉक्टर सांगतात की, सकाळचा नाश्ता हा अधिक हेल्दी आणि पौष्टिक असायला हवा. त्यासाठी आहारात पचायला हलके पण पोट भरतील अशा पदार्थांचे सेवन करायला हवे.

रविवार म्हटलं की, अनेकांच्या घरी साउथ इंडियन पदार्थांची रेलचेल अधिक असते. कामाला जाणाऱ्या गृहिणी इडली-डोश्याचे पीठ घरात बनवण्यापेक्षा रेडिमेड आणतात. परंतु, कधी कधी या इडली-डोश्यामुळे आपल्याला अॅसिडिटीचा सामना अधिक प्रमाणात करावा लागतो. जर तुम्हाला वीकेंडला हेल्दी (Healthy) आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर ज्वारीची इडली ट्राय करुन शकता पाहूया रेसिपी (Recipes).

1. साहित्य | Ingredients

  • ज्वारी ३ वाटी I Jowar 3 cups

  • उडीद डाळ १ वाटी I Udat Daal 1 cup

  • मेथी दाणे १/४ चमचा I Methi Dana(Fenugreek Seeds) ¼ tbsp

  • मुरमुरे १ वाटी I Flattened Rice(Murmure) 1 cup

  • मीठ चवीनुसार I Salt As per taste

  • तेल गरजेप्रमाणे I Oil As per requirement

2. कृती

  • एका भांड्यात ज्वारी घ्या, नीट धुवा आणि रात्रभर भिजवा.

  • दुसऱ्या भांड्यात उडद डाळ आणि मेथी दाणे घ्या, ते व्यवस्थित धुवा आणि रात्रभर भिजत ठेवा.

  • सकाळी ज्वारीतील पाणी काढून टाका आणि ज्वारी मिक्सर ग्राइंडरमध्ये घाला.

  • त्याचप्रमाणे उडद डाळ आणि मेथीच्या दाण्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये घाला.

  • वरील सर्व ३ घटक वेगवेगळे बारीक करा.

  • शेवटचे मिश्रण वाटताना त्यात मुरमुरेही बारीक करून घ्या.

  • वाटलेले सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात मिसळा आणि हाताने चांगले फेटून घ्या.

  • रात्रभर किंवा किमान १० ते १२ तास पीठ आंबवायला ठेवा.

  • दुसऱ्या दिवशी आंबवलेल्या पिठात चवीनुसार मीठ घाला आणि स्वादिष्ट इडली तयार करा.

  • ज्वारीची इडली खोबऱ्याच्या किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT