Peru Chi Chutney Recipe Guava Chutney Recipe in Marathi- Saam Tv
लाईफस्टाईल

Peru Chi Chutney Recipe: घरच्या घरी ट्राय करा पेरुची आंबट-गोड चटणी, पाहा रेसिपी

How To Make Guava Chutney : जर तुम्हालाही पेरुची चव चाखायची असेल तर त्याची चटणी ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

Ripe Guava Chutney :

हिवाळा सुरु झाला की, बाजारात सर्वत्र पाहायला मिळतात ते पेरु. या फळाच्या सेवनाने आरोग्य चांगले राहाते. वजन कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी पेरुचे सेवन केले जातात.

पेरु जितका स्वादिष्ट असतो तितकाच चविष्ट. यामध्ये जीवनसत्त्व ए, सी, फायबर आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. याचे सेवन केल्याने पचन सुधारते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर तसेच रक्त वाढण्यासही मदत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकदा पेरुचे तुकडे मीठ लावून चवीने खाल्ले जातात. बरेचदा पेरु भाजूनही खाल्ला जातो. जर तुम्हालाही पेरुची चव चाखायची असेल तर त्याची चटणी ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी 

1. साहित्यः

  • 300 ग्रॅम पेरू

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • १/२ इंच आले (Ginger)

  • 1 लिंबाचा रस

  • 1/2 टीस्पून धने पावडर

  • १/२ टीस्पून जिरे पावडर

  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

  • एक चिमूटभर हिंग

  • 1/2 टीस्पून काळे मीठ

  • 1/2 टीस्पून मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी (Water) घाला

2. कृती

  • पेरुला कापून त्याचे तुकडे करुन घ्या. पेरुची चटणी बनवण्यासाठी पेरु, कोथिंबीर आणि हिरवी मिरची धुवून घ्या.

  • त्यात आले घाला. यात धणेपूड, जिरेपूड, मिरपूड, २ चिमूटभर हिंग, काळे मीठ, घालून वरुन लिंबू पिळा.

  • तयार मिश्रण मिक्समध्ये बारीक वाटून घ्या. पेस्ट घट्ट झाल्यास त्यात पाणी घालून पुन्हा वाटा.

  • चटणी वाटीत काढून सर्व्ह करा. तयार आहे आंबट-गोड पेरुची चटणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: फक्त 198 रुपयांमध्ये दिवसाला मिळेल 2 GB डेटा, वाचा Jioची खास ऑफर

खाण व्यवसायासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली लाच; ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रशासनात खळबळ

Maharashtra Live News Update : राहुरी येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल

Famous Producer Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते काळाच्या पडद्याआड; 'या' गंभीर त्रासामुळे राहत्या घरी निधन

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; ठाकरे सेनेची अचानक एन्ट्री

SCROLL FOR NEXT