Matar Kulche Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Matar Kulche Recipe : दिल्ली स्टाइलचे मटर कुल्चे बनवायचे आहे तर, आजच ट्राय करा

पराठावाली गलीच्या पराठ्यांपासून ते मोमोजपासून ते छोले भटुरे ते गोल गप्पे आणि चाटपर्यंत अनेक पदार्थ दिल्लीची शान आहेत.

कोमल दामुद्रे

Matar Kulche Recipe : भारताच्या अनेक कानाकोपऱ्यात स्ट्रीट फूड मिळतात. तेथील प्रत्येक पदार्थांची चव देखील वेगळी आहे. भारताची खरी ओळख ही इथल्या स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये आहे. रस्तावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांना विशेष मागणी आणि प्रसिद्धी आहे.

दिल्ली (Delhi) रस्त्यावरील खाद्यपदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पराठावाली गलीच्या पराठ्यांपासून ते मोमोजपासून ते छोले भटुरे ते गोल गप्पे आणि चाटपर्यंत अनेक पदार्थ दिल्लीची शान आहेत.

दिल्लीमध्ये खाण्यापिण्याच्या बहुतेक ठिकाणी मटर कुल्च्यांचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. एका मोठ्या भांड्यात मटर चाट आणि त्यासोबतचा कुल्चा चवीला अप्रतिम लागतो. हे चविष्ट स्ट्रीट फूड घरी बनवू शकतो आणि बाजाराप्रमाणेच त्याचा आनंद घेऊ शकता. आज आपण मटर कुल्चा आणि छोले कुल्चा याची रेसिपी पाहुयात

साहित्य -

मटर कुल्चे बनवण्यासाठी- मटर, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, हिंग, भाजलेले जिरेपूड, चवीनुसार मीठ, चवीनुसार काळे मीठ, लिंबू

कुल्चे बनवण्यासाठी - मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, साखर (Sugar), तेल, दही आणि चवीनुसार मीठ

मटर कुल्चे बनवण्याची पद्धत

- सर्वप्रथम पांढरे वाटाणे रात्री ८-१० तास भिजत ठेवावे आणि सकाळी मटार कुकरमध्ये पाणी व मीठ घालून उकळावे.

- आता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालून तडतडून घ्या. कांदे, टोमॅटो परतून घ्या आणि सर्व मसाले घाला.( आपल्याला हवे असल्यास कांदा, टोमॅटो न भाजता कापूनही घालू शकतो)

- आता तयार मिश्रणात उकडलेले मटार घाला आणि कांदे, लिंबू आणि कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

कुल्चा बनवण्याची पद्धत

- सर्वप्रथम चाळणीणे पीठ चांगले चाळून घ्या आणि त्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून मिक्स करा.

- आता त्यात दही, मीठ, साखर आणि तेल घालून कोमट पाण्याने मऊ पीठ मळून घ्या.

- मळलेल्या पिठाभोवती तेल लावून एका मोठ्या भांड्यात कपड्याने झाकून ठेवा

- आता पिठाचा गोळा तयार करून लाटून घ्या.त्यावर थोडे जिरे आणि कॅरमचे दाणे टाका आणि दाबा जेणेकरून ते चिकटेल.

- आता कुल्चा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.आता लोणी किंवा तूप घालून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT