Pregnancy Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Pregnancy Weight Loss : महिलांनो, डिलिव्हरीनंतर वजन आटोक्यात आणायचे आहे? या टिप्स फॉलो कराच

How To Lose Weight after Pregnancy : प्रसूतीनंतर अनेक महिलांना सामोरे जावे लागते ते लठ्ठपणा. प्रसूतीनंतर स्त्रियांचे वजन हे पूर्वीपेक्षा जास्त वाढते. ज्याला प्रसुतिपश्चात वाढ म्हणतात.

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips :

गर्भधारणेपासून ते प्रसुतीपर्यंत स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या हार्मोनल बदलांमुळे प्रसूतीनंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतर अनेक महिलांना सामोरे जावे लागते ते लठ्ठपणा.

प्रसूतीनंतर स्त्रियांचे वजन हे पूर्वीपेक्षा जास्त वाढते. ज्याला प्रसुतिपश्चात वाढ म्हणतात. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार प्रसूतीनंतर जवळजवळ स्त्रियांचे वजन हे ५ किलोपेक्षा जास्त पटीने वाढते. तर काही महिलांचे वजन ६ महिन्यानंतर १० किलो किंवा त्याहून अधिक वाढते.

गर्भधारणेनंतर (Pregnancy) किंवा प्रसूतीनंतर वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी स्त्रियांना थोडे अवघड होते. जर तुम्ही देखील प्रसुतीनंतर वाढलेले वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या टिप्स (Tips) नक्की फॉलो करा.

1. स्तनपान

बाळंतपणानंतर आईचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी स्तनपान उपयुक्त ठरु शकते. स्तनपानामध्ये गर्भधारणेदरम्यान शरीरात जमा झालेल्या चरबीच्या पेशींचा वापर होतो. ज्यामुळे आईला बाळाला (Baby) आहार देताना त्यांच्या कॅलरीज बर्न करु शकतात.

2. प्रथिने

गर्भधारणेनंतर प्रत्येक नवीन आईने आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. असे केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. यासाठी तुमच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा.

3. व्यायाम

जर तुमची नॉर्मल प्रसुती झाली असेल तर डॉक्टरांना विचारुन ६ आठवड्यानंतर चालणे किंवा योगासने करा. हलका व्यायाम सुरु करा. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

4. झोप

गर्भधारणेनंतर ज्या महिला रात्री ७ तास झोपतात त्यांचे वजन लवकर कमी होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला प्रसुतीनंतर लवकर वजन कमी करायचे असेल तर पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT