Parenting tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

कंटाळवाण्या मुलांना एक्टिव कसे ठेवाल? या सोप्या टिप्सची मदत घ्या

शरीराच्या आरोग्यासोबतच मुलांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहणे गरजेचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सुट्ट्या लागल्यावर मुलांचा घरात दंगा सुरु असतो. मुलांमुळे घर देखील अगदी खेळते राहते. मुलं (Child) जेव्हा अधिक खेळतात तेव्हा त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती देखील सुदृढ राहते. अनेक प्रकारच्या आजारांपासून मुले लांब असतात. परंतु, मुलं सारखे सुस्त राहात असेल तर आपण काळजी करू लागतो. अशा परिस्थितीत, मुलाच्या सुस्तीचे कारण काय आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. याची अनेक कारणे असू शकतात जसे की, तब्येत बिघडणे, एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, पचन व्यवस्थित न होणे इत्यादी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या मुलांना चांगली झोप लागते. शरीराच्या आरोग्यासोबतच (Health) मुलांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढतो. चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होते. तर अशावेळी मुलांना एक्टिव कसे ठेवाल हे पाहूया

हे देखील पहा-

मुलांना एक्टिव ठेवण्यासाठी या गोष्टी करा

१. मुलांना एक्टिव ठेवण्यासाठी सर्वात आधी आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. मुलांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. मुलांसाठी कोणते उपक्रम योग्य असतील हे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

२. मुलांना मजेदार गोष्टी करायला द्या ज्यामुळे त्यांच्यावर कोणतेही ओझे नसेल आणि ते त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतील.

३. मुलांसाठी वयानुसार उपक्रम करा. लहान मुले जास्त कठीण व्यायाम करू शकत नाहीत. अशावेळी त्यांना सायकलिंग, डान्स इत्यादी केल्याने त्यांना कंटाळा येणार नाही आणि थकवाही येणार नाही.

४. त्यांचा दिवसाचा आराखडा तयार करा की, त्यांना खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

५. मुलांना स्वतःच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करु द्या. पालकांनी मुलांसोबत खेळा, संध्याकाळी फिरायला जा किंवा योगा करा. तसेच, जर मुलांना काही काळानंतर काही करायचे नसेल तर त्यांच्यावर जबरदस्तीही करू नका.

६. त्यांच्या आहाराबाबत विशेष काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यासाठी डाएट (Diet) प्लॅन बनवा.

७. मुलांसाठी बॉल किंवा इतर अशी खेळणी खरेदी करा आणि त्यांना खेळण्यास प्रोत्साहित करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३७ व्या वर्षी अजिंक्य नाईक बनले MCAचे सर्वात तरुण अध्यक्ष|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे हत्येचा कट रचनाऱ्यांच्या निषेधार्थ उद्या आंबेजोगाईमध्ये मोर्चा

Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात ट्विस्ट; अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानीला क्लीन चिट, पोलिसांचा युटर्न

Vande Bharat Express: भंगारातून सरकारच्या तिजोरीत ८०० कोटींची भर, ७ वंदे भारत ट्रेन खरेदी करता येईल इतका पैसा कमावला

SCROLL FOR NEXT