symptoms of stroke saam tv
लाईफस्टाईल

Brain Stroke Symptoms: थकवा समजून दुर्लक्ष करू नका, ही असू शकतात ब्रेन स्ट्रोकची लक्षणे; तज्ज्ञांकडून धक्कादायक माहिती

HealthTips : ब्रेन स्ट्रोक ही जीवघेणी समस्या असून, सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखली तर रुग्णाचे प्राण वाचवता येतात. बदलती जीवनशैली, ताण, झोपेचा अभाव यामुळे धोका वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

  • ब्रेन स्ट्रोक अचानक होतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो.

  • सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे अत्यावश्यक आहे.

  • बदलती जीवनशैली, ताण आणि झोपेचा अभाव हे मोठे कारण.

  • नियमित व्यायाम, आहार आणि डॉक्टरांचा सल्ला स्ट्रोक टाळू शकतो.

Brain Stroke Symptoms: मेंदू हा मानवाच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा आणि अविभाज्य घटक असतो. मेंदूशिवाय आपले शरीर कोणतीच क्रिया किंवा कार्य करत नाही. त्यातच सध्या ब्रेन स्ट्रोकचा धोका अनेकांमध्ये वाढत चालला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ब्रेन स्ट्रोक अचानक होतो आणि तो रुग्णाच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करू शकतो.

अनेक वेळा लोक सुरुवातीची लक्षणे ओळखत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या विषयावर तज्ज्ञ सांगतात की, जर ब्रेन स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे लगेच ओळखली गेली आणि वेळेवर उपचार केले गेले, तर रुग्णाचा जीव वाचवणे शक्य आहे.

अलीकडच्या काळात तरुणांमध्येही ब्रेन स्ट्रोकच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. यामागचे मोठे कारण म्हणजे जास्त कामाचा ताण, सततचा मानसिक तणाव, असंतुलित आहार आणि पुरेशी झोप न मिळणे. या कारणांमुळे शरीरावर होणारा ताण थेट मेंदूवर परिणाम करून स्ट्रोकची शक्यता निर्माण करतो.

स्ट्रोकदरम्यान रुग्णांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी, अचानक चक्कर , डोळ्यांना धूसर दिसणे, बोलण्यात अडचण येणे, चेहरा, हात किंवा पाय सुन्न होणे अशी अनेक लक्षणे जाणवायला सुरुवात होते. अनेकदा नकळत तोल जाणे, चालण्यात त्रास होणे किंवा वारंवार पडणे, अशक्तपणा हे देखील गंभीर इशारे मानले जातात. परंतु लोक ही लक्षणे थकवा किंवा साधी शारीरिक कमजोरी समजून दुर्लक्ष करतात.

जर वेळेवर लक्ष दिले गेले नाही तर स्ट्रोकचे दुष्परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. यात अर्धांगवायू, स्मृती कमी होणे, बोलता न येणे, नैराश्य आणि मानसिक ताण वाढणे या समस्या उद्भवतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे वेळेत उपचार न झाल्यास स्ट्रोक जीवघेणाही ठरू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ताण कमी करणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे हे स्ट्रोक टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरीर आणि मनाची काळजी घेणे, तसेच सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

मेंदूकडे रक्तपुरवठा थांबणे किंवा रक्तस्राव होणे यामुळे होणारी गंभीर वैद्यकीय स्थिती म्हणजे ब्रेन स्ट्रोक.

ब्रेन स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे कोणती?

अचानक डोकेदुखी, चक्कर येणे, बोलण्यात अडचण, चेहरा किंवा हात-पाय सुन्न होणे, तोल जाणे ही प्रमुख लक्षणे आहेत.

ब्रेन स्ट्रोक का होतो?

जास्त ताण, असंतुलित आहार, झोपेचा अभाव, धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी काय करावे?

नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताण कमी करणे, पुरेशी झोप घेणे, आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT